Ajit Pawar Special Report : काका-पुतण्या एकत्र? शरद पवारांच्या मनात काय चाललंय?
Ajit Pawar Special Report : काका-पुतण्या एकत्र? शरद पवारांच्या मनात काय चाललंय?
ल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे गळतीला घाबरतात असे मला वाटत नाही. 1980 साली 60 आमदार निवडून आणले होते, त्यातले 58 गेले होते. साहेब हे नेता बनविणारी फॅक्ट्री असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
माझी भुमिका ही साहेबांनी हिमालयावरुन उडी मारायला सांगितली तरी मी मारेन असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावर माझ्याशी कुणी बोलले नाही त्यामुळे अशी कुठलीही चर्चा होते आहे असे मला वाटत नाही. पण अशी कुठलीही चर्चा सुरू असल्याचे मला माहीती नाही असे आव्हाड म्हणाले. उत्तमराव जाणकर यांनी त्यांची भावना बोलून दाखवली हाच त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. ते सगळी मोकळीक देतात. तुम्हाला मत मांजता येते. फ्रंटलच्या लोकांनी उलट त्यांचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या काही नव्या नियुक्त्या करण्याचा प्रश्न नाही असेही आव्हाड म्हणाले.
All Shows

































