सीरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेल्या आगीत 21 वर्षीय प्रतिक पाष्टेनं गमावला जीव, नातेवाईकांचा आक्रोश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2021 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे : देशाला कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची बातमी लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला. दुर्घटना घडली तेथील दोन मजले वापरात होते. तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. कोव्हीडची लस जिथे बनवली जाते त्या विभागाला आगीचा फटका बसला नाही. प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.