VIDEO | शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं 88 जणांचा गौरव | मुंबई | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम Updated at: 18 Feb 2019 01:42 PM (IST)
उदय देशपांडे यांच्यासह विविध क्रीडाप्रकारांमधल्या मिळून ८८ खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना शिवछत्रपती पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. साताऱ्याची गिर्यारोहक प्रियंका मोहिते ही साहसी क्रीडा प्रकारात शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली. भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघांची उपकर्णधार स्मृती मानधनालाही शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कबड्डीत पुण्याच्या विकास काळे आणि सायली केरीपाळे, तर कुस्तीत पुण्याच्या उत्कर्ष काळे आणि कोल्हापूरची रेश्मा माने यांना शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.