Mumbai CNG Crisis : मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा तुटवडा

Continues below advertisement

मुंबई,ठाणे, नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा अजूनही पूर्ववत झालेला नाही.. मात्र काही ठिकाणी सीएनजी विक्रीस सुरूवात झालीये.. 
काही सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.. 
वडाळा येथील महानगर गॅसच्या सिटी स्टेशनच्या ठिकाणी सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या गेल पाईपलाईन दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे...
 त्यामुळे अजूनही काही सीएनजी पंपांमध्ये सीएनजीचा पुरवठा झालेला नाही.. मुंबई ठाणे नवी मुंबईतील ३८९ सीएनजी स्टेशनपैकी २२५  सीएनजी स्टेशन हे सुरू झाले आहेत.. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व सीएनजी स्टेशनवर गॅसचा पुरवठा पूर्ववत केला जाईल आज दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती  महानगर गॅसकडून देण्यात आली आहे .. सीएनजी पुरवठा होत नसल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी सीएनजी बस, सीएनजी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे


नवी मुंबईत काही ठिकाणी सीएनजी पंप काल रात्रीपासून सुरू झाले आहेत . तर काही ठिकाणी अद्याप बंद आहेत. 
सीएनजीचा तुटवडा मिळत नसल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा त्रास होतोय. दरम्यान नवी मुंबईतील सीएनजी पंपावरुन आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola