Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8 PM : 3 OCT 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण, आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाही, १५ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार आणि शनिवारी कोल्हापुरात. कसबा बावडा येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं करणार अनावरण. शनिवारी संविधान सन्मान संमेलनाला राहाणार उपस्थित.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री धनंजय मुंडेही राहणार उपस्थित
फडणवीसांच्या सभेत निघाला साप, नागपूरच्या जयताळा इथं आज बांधकाम कामगारांचा मेळाव्यात साप निघाल्यानं गोंधळ.
अमित शाहांच्या वक्तव्यांचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार, उद्धव ठाकरेंचं विधान.
सत्तेसाठी आणि पदासाठी तोतयेगिरी कोणी केली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय, उद्धव ठाकरेंच्या विधानावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर.
गेले दोन अडीच वर्ष न्याय मंदिराचे दार ठोठावत आहोत, पण न्याय मिळत नाही, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
उद्धव ठाकरे यांची परिषद पाहून वाईट वाटलं, ते बॅकफूटला गेलेत. शरद पवार, काँग्रेस नेते त्यांचा फोन उचलत नसल्यामुळे ते शांत झालेेत. नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका. त्यांच्यापेक्षा राऊतांना जास्त महत्व दिलं जात असल्याचंही केलं वक्तव्य
शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’तील लाभार्थी बहिणीशी व्हिडिओ कॉलमधून साधला संवाद. या महिलेनं योजनेतून मिळालेल्या पैशांमधून नवीन भांडी घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांचं नाव टाकलं.