TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP Majha
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
पोलिसांकडूनच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या, राहुल गांधींच मोठं वक्तव्य, सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानं त्यांची हत्या, RSS ची विचारधारा संविधान संपवणारी, राहुल गांधींची टीका.
राहुल गांधींनी परभणी दौरा राजकीय हेतूने केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर टीका.
सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येबाबत राहुल गांधांनी केलेले आरोप बिनबुडाचे, मंत्री आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका, हत्येचा तपास सर्व बाजूने सुरु असल्याचीही दिली माहिती.
राहुल गांधींकडून विजय वाकोडेंना श्रद्धांजली अर्पण, सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यविधीनंतर विजय वाकोडेंचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू.
देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारण आणू नका, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य, देशमुखांच्या हत्येमध्ये कोणाचाही हात असो कारवाई झालीच पाहिजे, शिरसाटांची भूमीका.
मंत्री उदय सामंतांनी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सात्वनपर भेट घेतलीये, हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडपर्यंत पोहोचणार, कठोरात कठोर कारवाई करणार, सामंत यांच्याकडून अश्वासन.