Shetkaryanchya Man ki Bat : भाव मिळेना म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला ABP Majha
Shetkaryanchya Man ki Bat : भाव मिळेना म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला ABP Majha
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी दुय्यम धंदा म्हणून भेंडी, वांगी, मिर्ची ,भसाळी, शिरोळा, दुधी,काकडी अश्या अन्य प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. परंतु व्यापाऱ्यांच्या मनमानी भावामुळे भाजीपाल्यांना योग्य दर मिळत नाहीं त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागतो. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी भेंडीला भाव परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी भेंडी रस्त्यावर टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे . कृषि बाजार समिती तसेच प्रशासन जर शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसेल तर शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे.
All Shows

































