Parner Saat Barachya Batmya : 200 गावरान गायी, 16 अश्व तर 50 हून अधिक काश्मिरी शेळ्या पाळणारा अवलिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहौसेला मोल नसतं असं म्हणतात याचीच प्रचिती आलीये पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील राहुल शिंदे यांच्या पशुप्रेमामुळे... शिंदे यांच्या आजोबांपासून त्यांच्या कुटुंबियांना पशुपालनाची आवड आहे...शेकडो एकर जमिनीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे सध्या 200 गावरान गायी आहेत, 16 अश्व आहेत तर 50 पेक्षा जास्त काश्मिरी शेळ्या आहेत...विशेष म्हणजे त्यांच्या अश्वांची देशाबाहेरही घोडदौड सुरू आहे... देशभरातील विविध पशुप्रदर्शनातही त्यांचे अश्व अव्वल ठरत आहेत... त्यांच्या काही अश्वांची नुकतीच श्रीलंकेत निर्यातही झाली...त्याची किंमत कमीत कमी दीड लाख तर जास्तीत जास्त दोन लाख रुपये होती, सहा अश्वांची त्यांनी निर्यात केलीये तर देशभरात 400 पेक्षा जास्त अश्वांची विक्री केलीये...हौसेला त्यांनी व्यवसाय बनविल्याने त्यांना आर्थिक फायदा देखील होतोय.