एक्स्प्लोर
Mumbai-Goa Highway | Raigad मध्ये मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण
रायगड जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाला मोठा फटका बसला आहे. नागोठणे कोलाड खांब परिसरात खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवासी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हसळा तालुक्यातही सकाळपासून तुफान पाऊस सुरू आहे. म्हसळा तालुक्यातील धोरजे गावाला जोडणारा छोटा पूल पाण्याखाली गेल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. म्हसळा-दिघी मार्गावरही पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला पुढील काही तास अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण रायगडमधील म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातही सकाळपासून पाऊस सुरू आहे. मुंबई-गोवा हायवेवरील सुकेली खिंडीजवळ आणि हॉटेल गोमांतक परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. वाहतुकीची कोंडी झाली असून, वाहनांचा वेग मंदावला आहे. "अर्धवट स्थितीत सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे त्याचा परिणाम वाहतुकीवरती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे."
All Shows
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग




























