Hinjewadi Encroachment Drive : PMRDA ची पहिली कारवाई, स्थानिकांचा विरोध
abp majha web team
Updated at:
03 Jul 2025 12:06 PM (IST)
पुण्यातील हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे PMRDA कडून आज पहिली कारवाई सुरू झाली आहे. मारूंजी ते फेज दोनच्या Wipro Circle-सकल मार्गावरील अतिक्रमण हटवण्याला सुरुवात झाली आहे. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच पावसानंतर हिंजवडीमध्ये पाणी साठून वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले होते. दोन वर्षांपूर्वी २२ मीटरचा मार्ग तयार झाला होता, मात्र तो अडवण्यात आला होता. आता PMRDA कडून राडारोडा काढण्याचे काम सुरू आहे. तसेच, ३०० मीटर रस्त्याचे कच्चे कामही सुरू झाले आहे. या रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जागा बाधित होत असल्याने स्थानिकांचा विरोध दिसून येत आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित आहे. एका स्थानिक नागरिकाने सांगितले, "आम्हाला उभं राहायलासुद्धा माणसाला जागा राहिलेली नाहीये." स्थानिकांचे म्हणणे आहे की, अर्धा रस्ता शेतकऱ्यांकडून आणि अर्धा दुसऱ्या बाजूने घ्यावा. पूर्वी Wipro कंपनीसाठी कवडीमोल भावाने जागा गेली आणि आता उर्वरित जागाही रस्त्यात जात असल्याने पूर्ण प्लॉट खराब होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंजवडीचा विकास आणि तिची प्रतिमा यावरही परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. हा रस्ता झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.