एक्स्प्लोर
Heavy Rain | Navi Mumbai, Panvel मध्ये मुसळधार पाऊस; आपत्ती व्यवस्थापन सज्ज
नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी संततधारेत पाऊस सुरू होता, मात्र दुपारी बारा नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाशी, कोपरखर्णे, सीबीडी, नेरूळ या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बारा नंतर पावसाचा जोर कमालीचा वाढलेला आहे. सध्या मुसळधार पाऊस पडत असला तरी अद्याप कुठेही पाणी साचलेले नाही किंवा झाडे पडल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. "जर पाऊस असाच दिवसभर पडत राहिला संध्याकाळपर्यंत रहा पाऊस राहिला तर मात्र सखल भागांमध्ये आहे ते पाणी साचण्यास सुरुवात होऊ शकते." महानगरपालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज करण्यात आलेले आहे. कुठेही अशा प्रकारची घटना घडल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी हे व्यवस्थापन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. संपूर्ण शहरावर ढगाळ वातावरण आहे. नवी मुंबई बरोबर पनवेल मध्ये सुद्धा पावसानं आपला जोर कायम ठेवलेला आहे.
All Shows
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग




























