Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: गेल्या दोन वेळच्या लोकसभेच्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि यंदाच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे,यावेळी महागाई, बेरोजगारी असे आर्थिक प्रश्न मतदारांच्या अजेंड्यावर असल्याने भाजपने दावा केलेली संख्या त्यांना गाठणे सध्यातरी अशक्य दिसत असल्याचं विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर (Suhas Palshikar) यांनी केलं. उत्तर प्रदेश हे सध्या राजकीयदृष्ट्या क्रिटिकल स्टेट असून त्याच्यासह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक या पाच राज्यामध्ये काय निकाल येईल त्यावर राजकीय गणित अवलंबून असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सुहास पळशीकर हे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे सखोल विश्लेषण केलं.
भाजपची मतं ही किंचित वाढणार, काँग्रेसची मतं ही किंचित वाढणार पण त्यामुळे अनेक छोटी पक्षांची मतं ही कमी होणार असं दिसतंय. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून, आर्थिक प्रश्नावरून लोकांमध्ये असंतोष असल्याचं दितंय.