Majha Katta Chaitanya Tamhane : युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंचा Cinematic Vision माझा कट्ट्यावर
abp majha web team
Updated at:
27 Nov 2021 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कोणत्याही सिनेमाची स्क्रिप्ट लिहणे अत्यंत कठीण असते. लिखाण हे 'अॅक्ट ऑफ करेज' आहे. कारण फिअर ऑफ फेल्युअर हे कायम डोक्यात असते. त्यामुळे मला लिखाण हे कायमच कठीण वाटते, असे मत ‘कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी व्यक्त केले. चैतन्य ताम्हाणे आज माझा कट्ट्यावर बोलत होते.
चैतन्य ताम्हाणे म्हणाले, मला एखादी स्क्रिप्ट लिहण्यासाठी दोन महिने पुरेसे होतात. परंतु सुरूवात करण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागतात. मी दरवेळी लिहिताना विचार करतो की, पुन्हा कधीच लिहिणार नाही. परंतु एकदा तुमची स्क्रिप्ट पूर्ण झाली की तुम्हाला समाधान मिळते.