Beed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीत
Beed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीत
एचआयव्ही च्या अफेने कुटुंबाला टाकले वाळीत.. बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना.. अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात पीडित कुटुंबाचा आरोप.. मुलीला एचआयव्हीने मृत्यु झाला होता. अशी खोटी माहिती पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटूंबाची समाजात बदनामी झाली असुन गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं, कोण्ही भेटत नाही जवळ येत नाही अशी आपबिती पीडित कुटुंबाने सांगीतली. बीडच्या आष्टी तालुक्यात या घटेनेने खळबळ उडाली आहे. एचआयव्हीच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. तर कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबले असल्याच पीडित कुटुंबच म्हणणं आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉ.ढाकणे, आणि पोलीस कर्मचारी बीट अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.. यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली यात पोलीस कर्मचारी काळे यांने तुमच्या मुलीला एचआयव्ही होता अस सांगत आहे. तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करुन घ्या अशी भीतीही दाखवली.. मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोटं सांगितलं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. गावाने वाळीत टाकले आहे, कोणीही जवळ येत नाही बोलतही नाही, यांना एचआयव्ही आहे. असं बोलत आहेत, त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्येसाठी गेली होती, असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं..