Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

Continues below advertisement

Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरू झालं आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. दरम्यान, “अमेरिकेला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी ऐतिहासिक अशा वेगाने काम करेन”, अशी ग्वाही ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दिली. ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता शपथ घेतली. अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत अध्यक्षांचा शपथविधी पार पडला. कारण अमेरिकेत सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे अमेरिकेन संसदेत या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, अध्यक्षपदाची शपथ घेताच ट्रम्प यांनी घेतलेला पहिला निर्णय पाहून जगाला आश्चर्य वाटू लागलं आहे. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेचा भाग नसेल. यासंबंधीच्या आदेशांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याचे आदेश देणाऱ्या दस्तावेजांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, “अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी देणारा देश होता”. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागकित आरोग्य संघटनेला मिळणारा निधी कमी होणार आहे. २०२४-२५ च्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात जागतिक आरोग्य संघटनेसाठी ६६२ मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram