MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवला

Continues below advertisement

MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवला

दहिसरमध्ये पुन्हा एकदा सुरू झाला हिंदी मराठी भाषेचा वाद. दोन परप्रांतीय बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मनसेने घेतला समाचार. दोन्ही परप्रांतीय बाऊन्सर्सनी मनसे कार्यकर्त्यांसमोर मागितली मराठीत माफी.  दहिसर येथील एका हॉटेलमध्ये एक मराठी माणूस गेला असता तेथे परप्रांतीय बाऊन्सर उभे होते...त्यानंतर बाऊन्सर आणि मराठी माणूस यांच्यात मराठी बोलण्यावरून वाद सुरू झाला. दोन्ही बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास आणि समजण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही बाऊन्सरची दखल घेतली. त्यानंतर दोन्ही परप्रांतीय बाऊन्सरनी मराठीत माफी मागितली.

हे ही वाचा..

बीड जिल्ह्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित वाल्मिक कराड (Walmik Karad) प्रकरणात पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे (Datta Khade) यांची काल (सोमवारी ता.20) राज्य गुन्हे अन्वेषणकडून (सीआयडी) चौकशी करण्यात आली. सध्या वाल्मिक कराड (Walmik Karad) 'सीआयडी'च्या कोठडीत आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. कराडने त्याच्या पत्नीच्या नावावर पुण्यात काही ठिकाणी फ्लॅट, ऑफीस स्पेसेस अशी कोट्यावधी रूपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ही बाब 'सीआयडी'च्या चौकशीत समोर आली आहे. या व्यवहारात भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे (Datta Khade) यांनी मध्यस्थी केल्याचा संशय 'सीआयडी'ला आहे. या पार्श्वभूमीवर 'सीआयडी'च्या विशेष पथकाने खाडे (Datta Khade) यांना बीड येथे बोलावून घेतले. या विशेष पथकाने खाडे यांची चौकशी केली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram