Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी. उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. धाराशिवसह, तुळजापूर, कळंब, वाशी तालुक्यात पाऊस.
सोलापूर शहरात पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. IMD नं सोलापुरात आज पावसाचा व्यक्त केला होता अंदाज. पावसानं बळीराजा सुखावणार.
वर्ध्यात सेलू आणि आजूबाजूच्या परिसरात मान्सूनच्या पहिल्या पावसाची जोरदार हजेरी. दीड तास कोसळला मुसळधार पाऊस. या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशीला मदत. खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्याची शक्यता.
वाशिमच्या कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस, नागरिकांना मिळाला उकाड्यापासून दिलासा. अचानकपणे पाऊस आल्यानं शहरात रस्त्याच्या काही भागात नाले तुंबून रस्त्यावर पाणी.
लातूर शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. औसा रोड, आंबेजोगाई रोड, बार्शी रोड, नांदेड रोड भागातील मुख्य रस्त्यावरून वाहू लागलं पाणी.
अकोल्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट.. अनेक ठिकाणी झाडं कोसळली.. तर काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत