TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता, पवार गट मविआकडे १०० जागांचा प्रस्ताव ठेवणार.
पुण्यातील विधानसभेच्या जागांवरुन ठाकरे गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही सहा जागांवर दावा, आठ पैकी ६ मतदारसंघ स्वतकडे ठेवण्याची दोन्ही गटांची मागणी.
माकपच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली, मविआच्या जागावाटपात १२ जागा देण्याची माकपची मागणी, प्रणिती शिंदेंच्या सोलापूर मध्य मतदारसंघाची ही माकपकडून मागणी.
भाजप लोकसभेच्या पराभवानंतर राज्यातील पराभूत मतदारसंघाचा घेणार आढावा, प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी.
पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता. यासाठी गांभीर्यानं बैठकीचं आयोजन करा. शरद पवारांची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्र लिहून मागणी.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन 'मॅक्झिमम विदर्भ', विदर्भावर खास लक्ष देणार तर भास्कर जाधवांवर याची जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती.