Monsoon Top 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : महापूर अपडेट्स 24 जुलै 2021
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Maharashtra Rain Flood Landslide update : राज्यात पावसाचा कहर सुरु असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 9 जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यात पावसामुळं दरडी कोसळून तसेच पुरात बुडून एकूण 76 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. दुर्घटना घडलेल्या तसेच महापूर आलेल्या ठिकाणी एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्य सुरु असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
पाटणमधील आंबेघर गावात काल भूस्खलन, 16 बेपत्ता, अखेर आज एनडीआरएफची टीम पोहोचली, बचावकार्य सुरु
राज्यात अतिपावसामुळं कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत. राज्यभरात 890 गावं बाधित झाली असून यात अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत एकूण 76 जणांना मृत्यू झाला असून 59 लोकं अद्याप बेपत्ता आहेत तर 38 जण जखमी झाले आहेत. राज्यात 16 घरांचं पूर्ण नुकसान झालं आहे तर 6 घरांचं अंशत: नुकसान झालं आहे. 90 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.