Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

Continues below advertisement

नारायण राणेंचे थोरले चिरंजीव म्हणजे शिवसेनेचे आमदार निलेश राणे... आणि धाकटे चिरंजीव म्हणजे भाजप नेते तसंच मंत्री नितेश राणे... सिंधुदुर्गातील नगरपरिषद निवडणुकांच्या निमित्तानं राणे विरूद्ध राणे अशी दोन भावांमध्येच लढत झाली.. दोन नगरपरिषदा एका लेकाच्या ताब्यात गेल्या आणि दोन नगरपरिषदा दुसऱ्या लेकाच्या ताब्यात गेल्या.. त्यामुळे राणे कुटुंब जिल्ह्यातील सगळ्याच नगरपरिषदांमध्ये सत्ताधीश झालं.. याशिवाय निलेश राणे देखील नितेश राणेंप्रमाणे आक्रमक आहेत हे देखील सिद्ध करण्याची संधी या निवडणुकांनी राणे कुटुंबाला दिली.. थोडक्यात काय.. राणेंनी गमावलं काहीच नाही... फक्त कमावलं...

 

मालवण आणि कणकवली नगरपरिषदेमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी दिलेली ही प्रतिक्रिया

हा गुलाल उधळण्यासाठी निलेश राणेंना काय काय करावं लागलं...


स्पर्धा सख्ख्या भावाशी म्हणजे मंत्री नितेश राणेंशी होती...मात्र त्याचीही पर्वा केली नाही

 

आणि निलेश राणेंच्या या श्रमाचं आणि त्यागाचं फळ त्यांना मिळालंय..

राणे ब्रदर्समधल्या लढतीमुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या, मालवण आणि कणकवली नगरपरिषदेत आपला नगराध्यक्ष बसवण्यात निलेश राणे यशस्वी झालेत

निलेश राणेंनी निवडणुका होईपर्यंत कुटुंब आणि पक्ष वेगवेगळे ठेवले... 

मात्र आता निकालानंतर त्यांच्याकडून या दोन्ही गोष्टींची सरसमिसळ होतेय..

म्हणूनच त्यांच्या एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत

थोरल्या भावाची म्हणजेच निलेश राणेंची ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर नितेश राणेंना देखील गदगदून आलं असेल..

कणकवली आणि मालवण नगरपरिषद भाजपनं गमावली असली तरी, त्यांचं पालकत्व स्वीकारून जे जे लागेल,  ते देण्याची तयारी नितेश राणेंनी दाखवलीय

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola