Anandache Pan | 'काळ्यामाळ्या भिंगोळ्या' लेखक कृष्णात खोत यांची नवीन कांदबरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnandache Pan | 'काळ्यामाळ्या भिंगोळ्या' लेखक कृष्णात खोत यांची नवीन कांदबरी
हे देखील वाचा
संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस, ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या!
पुणे : पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालख्या दाखल होणार आहे. शिवप्रतिष्ठानच्या (Shiv Pratishthan) धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या 'शिवप्रतिष्ठान'ला एक नोटीस पाठवली आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे नोटीसीत म्हटले आहे.
संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. तसंच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असं आळंदी देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे. यापूर्वी भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणल्याने आणि तेढ निर्माण करणारी भाषण केली होती, त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस दिली आहे.