Thackeray-Pawar : टाळली भेट, सत्काराची मेख;ठाकरे-पवारांमधील दरी वाढतेय? Special Report Rajkiya Sholay
विधानसभा निकाल लागल्यापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत.. अशावेळी त्यांनी दिल्लीला जाऊन शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, या प्रकारामुळे खरंतर भाजपमध्ये किंवा फडणवीस कॅम्पमध्ये खळबळ व्हायला हवी होती. पण ती झाली ठाकरेंच्या शिवसेनेत. संजय राऊतांची शरद पवारांवर सडकून टीका आणि त्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी दिलेलं समर्थन. या सगळ्याचा अर्थ काय जाणून घेऊयात.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
पुरस्कार सोहळा हा फक्त ट्रिगर असू शकतो. शरद पवारांवर टीका करत राहुल गांधी, अरविंद केजरीवालांना जवळ करणं यामागे आगामी पालिका निवडणुकांचं गणित सुद्धा असू शकतं. पाचच वर्षांपूर्वी शरद पवारांच्या सल्ल्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. एवढंच नाही तर शरद पवारांशिवाय मविआ सरकारचं पानही हलत नव्हतं असं बोललं जायचं.. हे चित्र बदलत आहे का? ठाकरे आणि पवारांमधली दरी वाढतेय का असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.