Solapur Garage Worker :आव्हानांचा वेढा, तरी MPSC त झेंडा;सोलापुरच्या बहिणींची यशोगाथा Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल नुकता जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये सोलापुरातील दोन सख्ख्या बहिणींनी घवघवीत असं यश संपादन केलं आहे. संजीवनी भोजने आणि सरोजनी भोजने असे या दोन्ही सख्ख्या बहिणींची नावे आहेत. वडील ज्योतीराम भोजने हे फुटपाथवर दुचाकी रिपेअर करतात. घरी अठरा विश्व दारिद्र्य, अवघी आठ बाय दहाची एक खोली एवढंच घर. अशात ही ह्या मुलींनी जिद्दीने अभ्यास केला. जवळपास 6-7 वेळा प्रयत्न केलं तरी थोडक्यात यश हुकत होते. पण जिद्द सोडली नाही, चिकाटीने अभ्यास केला पण ऐन परीक्षेच्या काळात वडिलांना पॅरालीसीसचा झटका आला. पून्हा एकदा होत्याच नव्हतं झालं. पण अशा काळात लहान भावाने स्वतःचे शिक्षण थांबवून बहिणींसाठी राबायला सुरुवात केली. आणि या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आज त्यांना प्राप्त झालं आहे. संजीवनी महसूल सहाय्यक तर सरोजिनी हे करसहाय्यक म्हणून नियुक्त झाली आहे. या भोजने कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी