WhatsApp Business App : 'व्हॉट्सअॅप बिझनेस' (WhatsApp Business) या अॅपने व्यवसायिकांना त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधण्याच्या तसेच त्यांचे उत्पादन आणि सेवांचा प्रचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या अॅपमध्ये असलेल्या विविध वैशिष्ट्यामुळे ग्राहक सेवा उद्योगात क्रांती घडवून आणण्याची त्याची क्षमता आहे. भारतातील डिजिटल मार्केटिंग सल्लागार म्हणून, मी प्रथमच या अॅपचे फायदे पाहिले आहेत. विशेषकरुन ग्राहकांना समाधानी ठेवण्यात आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात ते अत्यंत उपयुक्त ठरत आहे. 


'रिअल-टाईम कम्युनिकेशन' हे या अॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याद्वारे ग्राहकांचे प्रश्न आणि संदेशांना जलद आणि कार्यक्षमतेने प्रतिसाद देता येणे शक्य असल्याने ग्राहक देखील समाधानी राहतात. भारतात, एखाद्या व्यवसायाचे यश हे ग्राहक सेवा कशी आहे त्यावर अवलंबून असते. या अॅपच्या वैशिष्ट्यामुळे व्यावसायिक ग्राहकांच्या प्रश्नांना अधिक जलद प्रतिसाद देऊ शकतात त्यामुळे ग्राहकांचे समाधान होते. 


व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप हे ग्राहकांचे वर्तन, प्राधान्य याबद्दलची महत्त्वाची माहिती वापरकर्त्याला देते असल्याने त्याचा व्यवसायाच्या फायद्यासाठी उपयोग होतो. ग्राहकांच्या परस्परसंवादाचा मागोवा घेत आणि त्याबाबत डेटाचे विश्लेषण करत, व्यवसायिक त्यांच्या ग्राहकाला अनुसरुन त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखू शकतात. सतत बदलणाऱ्या बाजारपेठेसोबत डिजिटल मार्केटिंग धोरणे विकसित होणे आवश्यक आहे. म्हणून या अॅपचे विश्लेषण वैशिष्ट्य हे व्यवसायांना स्पर्धेत टिकण्यास मदत करु शकते. 


व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप वापरण्याचे फायदे काय आहेत?


हा एक छोटासा ऑनलाईन रिटेल व्यवसाय असून त्यासोबत मी अलीकडे काम केले आहे. विविध स्वरुपाची उत्पादने उपलब्ध असूनही व्यवसायिक ग्राहकांना त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी धडपडत होता. त्यांच्या सध्याच्या मार्केटिंग धोरणांचे विश्लेषण केल्यानंतर आम्ही व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप वापरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आम्ही या अॅपवर व्यवसायाचा पत्ता, फोन नंबर, प्रोफाईल चित्र आणि व्यवसायाचे वर्णन नमूद करत त्यांची एक प्रोफाइल तयार केली. त्यामुळे ते संभाव्य ग्राहकांसाठी अधिक आकर्षक झाले. यानंतर आम्ही ग्राहकांना व्यवसाय प्रचाराचे संदेश पाठवण्यासाठी या अॅपच्या प्रसारण वैशिष्ट्याचा वापर केला. त्यामध्ये ज्यांनी यापूर्वी खरेदी केली होती अशा ग्राहकांची यादी तयार केली आणि त्यांना नवीन उत्पादनांचा प्रचार करणारा संदेश पाठवला. हा संदेश वैयक्तिकृत (पर्सनालाईझ्ड) करण्यात आला होता. त्यात 'कॉल टू' या अॅक्शन बटणाचा समावेश होता आणि एका आठवड्यात खरेदी केलेल्या ग्राहकांना सवलत देऊ केली होती. त्याचा प्रतिसाद प्रचंड सकारात्मक आला आणि अनेक ग्राहकांनी ऑफरचा लाभ घेतला आणि विक्री वाढण्यास मदत झाली. 


व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य आम्ही वापरले ते म्हणजे तात्काळ उत्तरे होय. आम्ही सामान्य ग्राहकांच्या प्रश्नांची यादी तयार केली आणि त्याला झटपट प्रतिसाद देणारी द्रुत उत्तरे तयार केली. या वैशिष्ट्यामुळे ग्राहकांचे समाधान वाढण्यास आणि व्यवसायिकावरील कामाचा भारही कमी होण्यास मदत झाली. शेवटी, आम्ही ग्राहक वर्तन आणि प्राधान्यांचा मागोवा घेण्यासाठी या अॅपचे डेटा विश्लेषण वैशिष्ट्य वापरले. त्यामुळे कोणती उत्पादने सर्वात लोकप्रिय आहेत हे समजून घेत व्यावसायिकाला त्यांच्या उत्पादनाबद्दल योग्य ते निर्णय घेण्यास मदत झाली. 


भारतातील व्यवसायिकांमध्ये अॅप लोकप्रिय


एकूणच, व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपच्या वापरामुळे लहान ऑनलाईन रिटेल व्यवसायांना नवीन ग्राहक आकर्षित करणे, विक्री वाढवणे आणि ग्राहकांचे समाधान सुधारण्यात मदत झाली. खासकरुन ब्रॉडकास्ट मेसेज, झटपट प्रत्युत्तरे आणि विश्लेषण यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे अधिक सोपे झाले. हे अॅप भारतातील डिजिटल मार्केटिंग धोरणांचा अविभाज्य भाग बनले आहे आणि सर्व प्रकारचे व्यावसायिक त्याचे फायदे घेत आहेत. त्याची वापर सुलभता आणि साधेपणामुळे भारतातील व्यवसायिकांमध्ये ते लोकप्रियदेखील झाले आहे. 


कोविड काळातही अॅप उपयुक्त


कोविड महामारीच्या काळातही या अॅपची वैशिष्ट्ये उपयुक्त ठरली आहेत. व्यवसायिकांनी त्यांचे लक्ष ऑनलाईन विक्रीकडे वळवले असल्याने, या अॅपने निर्बंध असूनही त्यांची विक्री करु शकले. ग्राहक या अॅपद्वारे उत्पादने ऑर्डर करु शकतात सोबतच व्यवसायाबद्दल शंका आणि समस्यांबाबत त्वरित प्रतिसाद देऊ शकतात. या अॅपचे भविष्य आशादायक दिसत आहे आणि येत्या काही वर्षांत ते आणखी अत्याधुनिक होण्याची अपेक्षा आहे. नवीन वैशिष्ट्ये आणि क्षमता नियमितपणे जोडल्या जात असल्याने भारतातील व्यवसाय बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी त्याच्या फायद्यांचा लाभ घेऊ शकतात. 


शेवटी, हे अॅप हे भारतातील व्यवसायांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये आणि क्षमता व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी रिअल-टाईममध्ये संवाद साधण्याची सुविधा देतात. तसेच ग्राहक वर्तन आणि प्राधान्यांबद्दल मौल्यवान माहिती मिळाल्याने विक्रीबाबत वैयक्तिकृत विपणन मोहिमा तयार करण्यास मदत होते. 


हे अॅप एक शक्तिशाली साधन असले तरी ती जादूची कांडी नाही. सोबतच व्यवसायिकांना अजूनही एक मजबूत विपणन धोरण असणे आवश्यक आहे. यामध्ये ग्राहक समजून घेणे, त्यांच्यांशी संवाद साधणारी आकर्षक सामग्री तयार करणे आवश्यक आहे. 


डिजिटल मार्केटिंग टूलकिटमधील मौल्यवान साधन


शेवटी व्हॉट्सअॅप बिझनेस हे अॅप भारतातील कोणत्याही व्यवसायाच्या डिजिटल मार्केटिंग टूलकिटमध्ये एक मौल्यवान साधन आहे. त्याच्या वापरकर्ता-अनुकूल स्वरुप आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांमुळे हे व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्याची आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी देते. डिजिटल मार्केटिंग विकसित होत असताना स्पर्धात्मक राहण्यासाठी व्यवसायांनी नवीन साधने आणि तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक आहे. आधुनिक व्यवसाय जगतात प्रगती करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल याचे व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप हे उत्तम उदाहरण आहे. 


- निकिता व्होरा, डिजिटल मार्केटिंग ट्रेनर