Poco X5 Pro vs iQOO Neo 7 5G: Poco आणि IQ ने त्यांचा नवीन फ्लॅगशिप फोन बाजारात लॉन्च केला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी मिळते. आज या बातमीत जाणून घ्या, कॅमेरा, बॅटरी, स्पेसिफिकेशन आणि किंमतीच्या बाबतीत कोणता फोन तुमच्यासाठी चांगला आहे. येथे आम्ही तुम्हाला Poco X5 Pro 5G आणि iQoo Neo 7 ची तुलना सांगणार आहोत.


Poco X5 Pro vs iQOO Neo 7 5G:  किंमत 


iQoo Neo 7 5G ने बाजारात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेले व्हेरिएंट 29,999 रुपयांना सादर केले आहेत. तर कंपनीच्या 12/256GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. Poco बद्दल बोलायचे झाले तर Poco x5pro दोन मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 6/128 GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे, तर 8/256 GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे.


Poco X5 Pro vs iQOO Neo 7 5G: स्पेसिफिकेशन 


iQoo Neo 7 5G मध्ये तुम्हाला Dual Nano SIM चा पर्याय मिळतो आणि तो Android 13 आधारित Funtouch OS 13 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा FHD प्लस AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8200 5G चिपसेटवर काम करतो. तर Poco X5 Pro 5Gb Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करतो. यात 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजचा पर्याय मिळतो. हा मोबाइल फोन Android 12 वर काम करतो.


Poco X5 Pro vs iQOO Neo 7 5G: कॅमेरा


iQoo Neo 7 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. Poco x5pro देखील ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. परंतु त्यातील प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे. एक 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे.


Poco X5 Pro vs iQOO Neo 7 5G:  बॅटरी


दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळते. पण IQ मध्ये तुम्हाला 120 W फास्ट चार्जिंग मिळते. तर Poco x5pro मध्ये 67 W फास्ट चार्जिंग दिले जाते. IQ ने दावा केला आहे की, iQoo Neo 7 5G फक्त 10 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होतो.


या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्यासाठी योग्य फोन निवडू शकता. जर बजेट कमी असेल तर Poco x5pro तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल, कारण तुम्हाला त्याचा 8/256GB  24,999 रुपयांमध्ये मिळेल, तर IQ चे बेस मॉडेल 29,999 रुपयांपासून सुरू होते.