Samsung Galaxy A05s : 2000 रुपयांनी स्वस्त झाला आहे Samsung Galaxy A05s ! जाणून घ्या याची किंमत आणि ऑफर्स..
Samsung Galaxy A05s : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. तुम्ही आजच तुमच्या बजेटनुसार कमी किमतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा फोन खरेदी करू शकता.
Samsung Galaxy A05s : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार (Samsung) करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. तुम्ही आजच तुमच्या बजेटनुसार कमी किमतीचा आणि चांगल्या क्वालिटीचा फोन खरेदी करू शकता. Samsung Galaxy A05s स्मार्टफोनच्या किमतीमध्ये 2000 रुपयांनी घट झालेली आहे. स्मार्टफोनची किंमत 12-15 हजार रुपये याच्यामध्ये आहे. मात्र सध्या याच्या किमतीमध्ये 1000 ते 2000 रुपयांमध्ये घट झालेली आहे.चांगल्या क्वालिटीमध्ये आणि चांगल्या किमतीमध्ये हा फोन खरेदी करणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनचे फिचर्स आणि ऑफर्स जाणून घेऊयात..
किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy A05s स्मार्टफोनला गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लॉऔच केलं होतं. फोन मध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅम हे ऑप्शन दिले आहेत.या फोनच्या 4GB रॅम वेरिएंट याच्या किमतीमध्ये 1000 रुपयांची घट करण्यात आलेली आहे तसेच 6GB रॅम वेरिएंट याच्या किमतीमध्ये 2000 रुपयांची घट करण्यात आली आहे. याच्या 4GB रैम व्हेरिएंट ची किंमत 11499 रुपये एवढी आहे तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये एवढी आहे.हा फोन लाईट ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये तुम्हाला मिळू शकतो.
Samsung Galaxy A05s चे स्पेसिफिकेशन्स -
Samsung Galaxy A05s स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्ट आहे.फोनच्या स्टोरेजला मेमरी कार्ड च्या मदतीने 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन एंड्रॉयड 13 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. याच्यामध्ये 6.7इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले सपोर्ट दिला आहे. हा फोन 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशन सपोर्टसोबत येतो. तसेच ड्युअल सिम सपोर्ट सुद्धा यात मिळतो. या फोन मध्ये ट्रिपल रियर कैमरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये 50MP मेन कॅमेरा सेंसर आहे आणि सोबतच 2MP डेप्थ सेंसर आणि 2MP मायक्रो कॅमेरा सेंसर दिलेला आहे. फोन 13 MP फ्रंट कॅमेरा सेंसर सोबत येईल. Samsung Galaxy A05s स्मार्टफोन मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट दिलेला आहे. फोन चार्जिंग साठी 25W चा सपोर्ट असणार आहे.या फोनमध्ये 5000 mAh सपोर्ट दिलेला आहे.बजेट फ्रेंडली आणि चांगल्या क्वालिटीचा हा फोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
इतर महत्वाची बातमी-