एक्स्प्लोर

Meta Subscription Plans: मेटाचा मोठा निर्णय! आता Instagram, Facebook वापरायचं तर पैसे मोजावे लागणार? नव्या प्लान्सची जोरदार चर्चा

आतापर्यंत जाहिरातींवर अवलंबून असलेले Meta आता सबस्क्रिप्शन मॉडेलद्वारे कमाई वाढवण्याचा प्रयत्न करत आहे

Meta Subscription Plans: मेटाने एक मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या यूजर्सवर होणार आहे. कंपनीने इस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लान्स आणले आहेत. हे प्लान्स जगभरातील यूजर्ससाठी उपलब्ध होणार असून भारताचाही त्यात समावेश आहे. (Meta Subscription Plans)

मेटा आता आपल्या ॲप्सचे ‘प्लस’ व्हर्जन लॉन्च करत आहे. या प्लानमध्ये पैसे देणाऱ्या यूजर्सना खास टूल्स, कस्टमायझेशन फीचर्स आणि प्रीमियम अनुभव मिळणार आहे. हे फीचर्स फ्री व्हर्जनमध्ये उपलब्ध नसतील. कंपनीचा महसूल वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत जाहिरातींवर अवलंबून असलेले Meta आता सबस्क्रिप्शन मॉडेलद्वारे कमाई वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. (Technology)

Instagram, Facebook आणि WhatsApp प्लान्सची किंमत किती?

इंस्टाग्राम प्लस आणि फेसबूक प्लसची किंमत 3.99 डॉलर (सुमारे 387 रुपये) प्रति महिना ठेवण्यात आली आहे. तर व्हाट्सॲप प्लससाठी 2.99 डॉलर (सुमारे 290 रुपये) मोजावे लागतील. मात्र भारतातील अधिकृत किंमतींची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

व्हाट्सॲप Plus मध्ये काय मिळणार?

टेक क्रन्चच्या रिपोर्टनुसार, व्हाट्सॲप प्लसमध्ये यूजर्सना कस्टम थीम्स, युनिक रिंगटोन्स, प्रीमियम स्टिकर्स आणि अधिक चॅट्स पिन करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच पर्सनलाइज्ड मेसेजिंग अनुभवावर कंपनी अधिक भर देणार आहे.

इस्टा आणि फेसबूकलाही मिळणार प्रीमियम फीचर्स

-इंस्टाग्राम प्लस वापरणाऱ्या यूजर्सना त्यांच्या स्टोरी किती वेळा पुन्हा पाहिली गेली हे पाहता येणार आहे. 

-तसेच ‘Close Friends’ फीचरच्या पुढे जाऊन अनलिमिटेड स्टोरी ऑडियन्स लिस्ट तयार करता येणार आहे.

- याशिवाय, स्टोरी प्रीव्ह्यू पाहताना यूजरचं नाव व्ह्यूअर्स लिस्टमध्ये दिसणार नाही. 

-स्टोरी 24 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवण्याचाही पर्याय मिळणार आहे. 

-दर आठवड्याला एक स्टोरी ‘स्पॉटलाइट’ करून तिची व्हिजिबिलिटी वाढवता येणार आहे.

Meta कडून काही कॉस्मेटिक अपग्रेड्सही देण्यात येणार आहेत. यात ॲनिमेटेड सुपर हार्ट रिॲक्शन, कस्टम ॲप आयकॉन्स, बायोसाठी विशेष फॉन्ट्स आणि अधिक प्रोफाइल पिन्सचा समावेश आहे.

'Meta Verified' पेक्षा वेगळे प्लान्स

मेटाचे हे नवीन प्लान्स Meta Verified पेक्षा वेगळे असतील. Meta Verified ही कंपनीची आधीपासून असलेली पेड सेवा आहे. त्यात आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आणि कस्टमर सपोर्टसारख्या सुविधा दिल्या जातात.

Meta AI साठीही आले नवीन प्लान्स

मेटाने ‘Meta One’ नावाने AI आधारित नवीन प्लान्सही लॉन्च केले आहेत. ‘Meta One Plus’ प्लानची किंमत 7.99 डॉलर (सुमारे 775 रुपये) प्रति महिना आहे. हा प्लान इमेज आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या तसेच मोठे AI टास्क करणाऱ्या यूजर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. तर ‘Meta One Premium’ प्लानची किंमत 19.99 डॉलर (सुमारे 1,939 रुपये) प्रति महिना आहे. यात अधिक यूज लिमिटसह सर्व प्रीमियम फीचर्स मिळतील. कंपनीने स्पष्ट केलं आहे की Meta AI चॅटबॉटचा फ्री वापर सुरू राहणार आहे. मात्र जास्त वापर करणाऱ्या यूजर्सना ठराविक लिमिटनंतर पेड प्लान घ्यावा लागू शकतो.

क्रिएटर्स आणि बिझनेससाठी खास प्लान्स

मेटाने क्रिएटर्स आणि बिझनेस यूजर्ससाठी ‘Meta One Essential’ आणि ‘Meta One Advanced’ प्लान्सही आणले आहेत. Meta One Essential ची किंमत 14.99 डॉलर (सुमारे 1,454 रुपये) आहे. यात व्हेरिफिकेशन बेनिफिट्स आणि विविध प्लॅटफॉर्म्सवर स्वतःला प्रमोट करण्याची सुविधा मिळणार आहे. तर Meta One Advanced प्लान इन्फ्लुएंसर्स आणि बिझनेससाठी तयार करण्यात आला आहे. या प्लानमध्ये फेसबुक फीड आणि सर्च रिझल्टमध्ये प्राधान्य मिळण्यासारखे फीचर्स दिले जाणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget