एक्स्प्लोर

कॅनडात फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन NEWS हद्दपार; मेटाचा सोशल मीडिया युजर्सना मोठा धक्का

मेटाने कॅनडातील सोशल मीडिया युजर्सना मोठा धक्का दिला आहे. मेटानं फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. पण मेटानं हा निर्णय का घेतला? जाणून घेऊयात सविस्तर...

Meta Blocks News on Facebook and Instagram In Canada: मेटानं एक मोठा निर्णय घेत कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना धक्का दिला आहे. आता कॅनडातील फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्स दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर बातम्या किंवा बातम्यांच्या लिंक पाहू शकणार नाही. 

आजच्या युगात सोशल मीडिया (Social Media) लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक दिवसातील अनेक तास सोशल मीडियावर गुंतलेले असतात. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही तर माहितीसाठीही होऊ शकतो. जगभरातील अनेक लोक सोशल मीडियाचा वापर फक्त बातम्यांसाठी करतात. इंटरनेटच्या या जगात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) हे दोन उत्तम पर्याय आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्म बातम्या युजर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, अशातच मेटाच्या निर्णयामुळे कॅनडातील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सना धक्का बसणार आहे.

कॅनडामधील युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या पाहू शकणार नाहीत

नुकताच मेटानं मोठा निर्णय घेतला असून, कॅनडातील सोशल मीडिया युजर्सना मेटाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. मेटाच्या निर्णयानुसार, कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्स यापुढे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या पाहू शकणार नाहीत. मेटानं कॅनडामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्याही ब्लॉक केल्या आहेत.

मेटानं कॅनडात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया कंपन्यांना बातम्यांच्या बदल्यात वृत्त प्रकाशकांना पैसे द्यावे लागतील, या कायद्याचा निषेध म्हणून मेटाने हा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम फेसबुक, गुगल आणि ट्विटरसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना लागू होणार आहे. गुगलनंही असाच इशारा दिला आहे.

मेटानं एका निवेदनात म्हटलं आहे की, प्रकाशकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. आता बातम्यांच्या लिंक कॅनडातील कोणत्याही युजर्सना पाहता येणार नाहीत. याव्यतिरिक्त मेटानं आपल्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बातम्यांचं शेअरिंगही बंद केलं आहे. मेटाचं म्हणणं आहे की, बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्याची सुरुवात मंगळवारपासून झाली आहे. हे पुढचे अनेक आठवडे सुरुच राहिल. दरम्यान, AFP च्या एका रिपोर्टरनं फेसबुकवर न्यूज पाहिल्याचा दावा केला आहे. पण अनेक युजर्सनी बातम्यांच्या लिंक दिसतच नसल्याचाही दावा केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget