Leap Day 2024 : आज 29 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच लीप वर्ष (Leap Day). याच निमित्ताने गुगलकडून खास डूडल शेअर करण्यात आलं आहे. या डूडलच्या माध्यमातून गुगलने लीप डे एका खास पद्धतीने साजरा केला आहे. गुगलने सादर केलेलं हे डूडल का खास आहे? लीप वर्ष म्हणजे काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
गुगलचे डूडल खास का आहे?
कोणत्याही समारंभाच्या वेळी तसेच विशेष दिनाच्या निमित्ताने गुगलचे डूडल पाहण्यासाठी लोक फार उत्सुक असतात. 29 फेब्रुवारी हा दिवस यासाठी खास आहे याचं कारण म्हणजे हा दिवस दर चार वर्षांनी येतो. या दिवसाची जगभरात एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. Google ने देखील हा दिवस आपल्या नवीन डूडलद्वारे साजरा केला आहे. Google चे डूडल सामान्यतः एखाद्या व्यक्ती, कार्यक्रम किंवा विशिष्ट देशाशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाबद्दल असतात. पण, लीप इयर सेलिब्रेशनचे डूडल सर्व देशांशी संबंधित आहे.
लीप वर्ष का होते?
लीप वर्ष म्हणजे प्रत्येक लीप वर्षानंतर येणारंच नव्हे तर या दिनाचं स्वत:चं असं वेगळं महत्त्व आहे. पृथ्वीवर एका दिवसात 23.262222 तास असतात. त्याच वेळी, जर दरवर्षी 29 फेब्रुवारीची तारीख जोडली गेली, तर कॅलेंडर 44 मिनिटांनी पुढे जाईल, ज्यामुळे सर्व ऋतू आणि महिन्यांमध्ये एक वेगळा फरक निर्माण होऊ शकतो.
लीप डे नसेल तर काय होईल?
29 फेब्रुवारी हा दिवस कॅलेंडर आणि पृथ्वीच्या कक्षेत संतुलन निर्माण करण्यास मदत करणारा आहे. हा लीप डे नसेल तर मे-जूनमध्ये येणारी उष्णता नोव्हेंबर महिन्यात येण्यास सुरुवात होईल. 29 फेब्रुवारीच्या आगमनाने, सर्व ऋतू दरवर्षी योग्य महिन्यात येतात. यामुळे कॅलेंडरमध्ये संतुलन राखले जाते.
लीप डे कसा झाला?
पूर्वीच्या काळी सूर्याच्या स्थितीनुसार दिवस ठरवले जायचे. पण काळाच्या मागणीने कॅलेंडर लोकांसमोर आलं. ज्युलियस सीझरने 45 बीसी मध्ये आपल्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडला. पण, याही पलीकडे प्रति सौर वर्षात 11 मिनिटांचा फरक दिसत होता. त्यानंतर, 16 व्या शतकात, पोप ग्रेगरी XIII ने ग्रेगोरियन कॅलेंडर सादर केले. ज्यामध्ये 29 फेब्रुवारीचा लीप दिवस समाविष्ट होता. यावरून हे स्पष्ट होतं की, लीप दिवस 100 ने भागण्याऐवजी 4 ने भागल्यास येईल. तसेच, 400 ने भागलेल्या वर्षाला लीप वर्ष देखील म्हटले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :