Smartphone Hack : विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती जसजशी होत चालली आहे. तसतसा स्मार्टफोनच्या (Smartphone) जगतातही बदल होत चालला आहे. फायदे तर आहेतच पण त्याचबरोबर त्याचे तोटेही आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी साध्या आणि सोप्या झाल्या आहेत. एका देशातून दुसऱ्या देशातील लोकांशी सहज संपर्क साधू शकतो. त्याचप्रमाणे, दूरवर बसलेला सायबर गुन्हेगारही (Cyber Crime) तुमचा स्मार्टफोन हॅक करू शकतो.


जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवायचा असेल आणि तुमचा स्मार्टफोन कोणीतरी हॅक केला आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा हॅक झाला आहे की नाही हे सहज शोधू शकता.


स्मार्टफोन अचानक स्लो होणं 


स्मार्टफोन अचानक स्लो होणं हे फोन हॅक होण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण आणि चिन्ह आहे. जर तुमचा स्मार्टफोन अचानक गरजेपेक्षा जास्त हळू काम करत असेल किंवा खूप हँग होत असेल तर वेळीच काळजी घ्या. खरंतर, हॅकिंग दरम्यान, अनेक प्रोग्राम्स डिव्हाईसच्या पार्श्वभूमीमध्ये कार्यरत असतात, ज्यामुळे डिव्हाईसचा स्पीड कमी होतो. याशिवाय, इंटरनेटचा वेग चांगला असला तरीही, जर तुम्हाला तुमच्या फोनवर इंटरनेट वापरताना समस्या येत असतील तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे.  


स्मार्टफोन आपोआप बंद होणं आणि रिस्टार्ट होणं  


तुमचा स्मार्टफोन हॅक होण्याचं हेदेखील एक लक्षण आहे. जर तुमचा स्मार्टफोन सतत बंद होत असेल किंवा आपोआप रीस्टार्ट होत असेल तर कदाचित हा तुमच्यासाठी रेड सिग्नल असू शकतो. याशिवाय जर तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग्ज आणि ॲप्स आपोआप बदलत असतील तर तुम्ही अजूनही हॅकर्सच्या ताब्यात आहात.


बॅटरी लवकर संपणं


जर तुमच्या फोनची बॅटरी अचानक संपत असेल तर हेदेखील तुमचा फोन हॅक होण्याचं एक लक्षण आहे. खरंतर, फोन हॅक झाल्यानंतर, हॅकर्स अनेक मालवेअर, ॲप्स आणि डेटावर प्रोसेस करतात. या प्रक्रियेत बॅटरी खूप खर्च होते. 


तुमचा स्मार्टफोन हॅक झाल्यास काय कराल?


जर तुमचा स्मार्टफोन हॅक झाला असेल, तर तो लगेच फॉरमॅट करा. तसेच, तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, तुम्ही चुकूनही स्मार्टफोनचा बॅकअप घेऊ नका. कारण असे केल्याने फोनच्या बॅकअपसोबत मालवेअरही येईल आणि तो तुमच्या फोनमध्ये पुन्हा इन्स्टॉल होईल.


महत्त्वाच्या बातम्या :


Tecno ने लॉन्च केला Robot Dog; कॅमेरा आणि दुर्बिणीसह पेट डॉगप्रमाणे तुमची सगळी कामं करणार; कसा दिसतो पाहाच