Pan Card Update : सरकारी कामकाज असो वा बॅंकेतील कामं यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आपल्याला पॅन कार्डची (Pan Card) गरज भासते. अशा वेळी पॅन कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्हीसुद्धा पॅनकार्ड बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी पॅन कार्ड बनविण्याची अतिशय सोपी पद्धत सांगणार आहोत. जेणेकरून, तुम्हाला पॅन कार्ड बनवण्यासाठी बाहेर जावं लागणार नाही.


खरंतर, ऑनलाईन पद्धतीने पॅनकार्ड बनविण्याची ही सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. तसेच, यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. हा ई-पॅन आहे, त्यामुळे त्याच्या मदतीने तुमच्या ईमेलवर पॅन क्रमांक येणार आहे. तुम्ही हा पॅन क्रमांक कोणत्याही ठिकाणी सहज वापरू शकता. पण, याची तुम्हाला प्रिंट मिळणार नाही.  ई-पॅनसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, मेलवर फक्त एकदाच ई-पॅन जारी केला जातो.


अर्ज कसा करावा?


अर्ज करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. यामध्ये तुम्ही ई-पॅनच्या ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला Get New E-PAN दिसेल. येथे गेल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल आणि भरण्यासाठी एक फॉर्म देखील दिला जाईल. यानंतर तुम्हाला मेल आणि मोबाईल नंबर एन्टर करावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर काही मिनिटांत तुमच्या ई-मेलवर ई-पॅन येईल.


तुमच्या ई-मेलवर ई-पॅन आल्यानंतर हा पॅन क्रमांक तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी सहज वापरू शकता. पण, यामध्ये तुम्हाला पॅनकार्डची प्रिंट मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठेही पॅनकार्ड दाखवताना तो ऑनलाईन पद्धतीनेच दाखवावा लागेल.  


ई-पॅन बनविण्याची ही अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. याच्या मदतीने तुमची अनेक कामं अगदी सहज पूर्ण होऊ शकतात. तसेच, यासाठी कोणावर अवलंबून राहण्याचीही गरज लागणार नाही. तसेच, ई-पॅन बनविण्यासाठी जास्त दिवसांचा कालावधीही लागत नाही. अगदी कमी दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते. तसेच, आजच्या डिजीटल युगात वापरता येणारी ही अतिशय सोपी पद्धत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता