एक्स्प्लोर

iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती

iPhone 18 Pro iPhone 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलने अखेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे आपले नवे प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले आहेत.

iPhone 18 Pro iPhone 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलने अखेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे आपले नवे प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले आहेत. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत अनुक्रमे 1 लाख 64 हजार 900 रुपये आणि 1 लाख 79 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. नव्या iPhone 18 Pro सीरिजमध्ये शक्तिशाली A20 Pro चिप, 48MP व्हेरिएबल अपर्चर कॅमेरा, सुधारित AI फीचर्स आणि दमदार बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. मात्र, यंदा ॲपलने नियमित iPhone 18 बेस मॉडेल लाँच न करता थेट Pro आणि Pro Max मॉडेल्सवर भर दिल्याने टेकविश्वात चर्चेला उधाण आले आहे. तसेच ॲपलने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Duo देखील लाँच केला आहे. या iPhone Duo ची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील iPhone Duo ने धुमाकूळ घातला आहे. भारतात iPhone Duoची सुरुवातीची किंमत ₹2,99,900 आहे. (iPhone 18 Series Marathi News)

18 सप्टेंबरपासून विक्री- (New iPhone Marathi News)

ॲपलने 9 सप्टेंबर 2026 रोजी आपल्या नव्या iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मॉडेल्सची अधिकृत घोषणा केली. यंदा नियमित iPhone 18 बेस मॉडेल लाँच करण्यात आलेले नाही. नव्या प्रो मॉडेल्समध्ये A20 Pro चिप, सुधारित कॅमेरा, नवीन व्हेरिएबल अपर्चर तंत्रज्ञान, अधिक शक्तिशाली AI क्षमता आणि मोठ्या बॅटरीचा समावेश आहे. भारतात या दोन्ही फोनची प्री-ऑर्डर 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू होणार असून, विक्री 18 सप्टेंबरपासून सुरू होईल.

तब्बल 43 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ- (iPhone 18 Pro,  iPhone 18 Pro Max Feature Marathi News)

नव्या iPhone 18 Pro मध्ये 6.3 इंच, तर iPhone 18 Pro Max मध्ये 6.9 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये A20 Pro चिप, नवीन व्हेपर-कूलिंग सिस्टम आणि 48MP Fusion कॅमेरा सिस्टम आहे. मुख्य कॅमेऱ्यातील नवीन व्हेरिएबल अपर्चर कमी प्रकाशात अधिक चांगले फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मदत करते. Pro Max मध्ये व्हिडिओ प्लेबॅकसाठी तब्बल 43 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. फोन Burgundy, Glacier, Silver आणि Black या चार रंगांमध्ये उपलब्ध असतील.

iPhone Duo चे जबरदस्त फीचर्स- (iPhone Duo Feature)

iPhone Duo ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचा फोल्डेबल डिस्प्ले. या फोनमध्ये कंपनीने 7.6 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले दिला आहे. इतक्या मोठ्या आकाराचा डिस्प्ले यापूर्वी कोणत्याही iPhone मध्ये देण्यात आला नव्हता. फोनच्या बाहेरील बाजूस 5.4 इंचाचा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. दोन्ही डिस्प्लेमध्ये ProMotion, Always-On Display आणि आउटडोअरमध्ये 3,000 निट्सपर्यंत ब्राइटनेस सपोर्ट मिळतो. याशिवाय, फोनला IP68 रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोल्डेबल फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. iPhone Duo च्या कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीने या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याऐवजी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सेलचा Fusion Main कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा Fusion Ultra Wide कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या फोनमध्ये Apple Intelligence आणि Siri AI चा सपोर्टही मिळतो. या फीचर्सच्या माध्यमातून Apple वापरकर्त्यांना अधिक वैयक्तिक आणि स्मार्ट अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतातील iPhone 18 Pro किंमत- (iPhone 18 Pro Price Marathi News)

  • 256GB – ₹1,64,900
  • 512GB – ₹1,89,900
  • 1TB – ₹2,39,900
  • 2TB – ₹3,14,900

भारतातील iPhone 18 Pro Max किंमत- (iPhone 18 Pro Max Price Marathi News)

  • 256GB – ₹1,79,900
  • 512GB – ₹2,04,900
  • 1TB – ₹2,54,900
  • 2TB – ₹3,29,900

फोल्डेबल स्मार्टफोन iPhone Duo ची भारतातील किंमत- (iPhone Duo Price Marathi News)

  • 256GB - ₹2,99,900
  • 512GB - ₹3,24,900
  • 1TB - ₹3,74,900
  • 2TB - ₹4,49,900

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Advertisement

व्हिडीओ

BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget