(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Infinix GT 10 Pro भारतात लाँच; लूकही जबरदस्त आणि किंमतही स्वस्त, 'ही' आहेत खास वैशिष्ट्य
Infinix GT 10 Pro Launched : या मोबाईलमध्ये 5000 mAh बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 108MP प्रायमरी कॅमेरा आहे.
Infinix GT 10 Pro Launched : तुम्हाला जर स्वस्तात मस्त स्मार्टफोन (Smartphone) विकत घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Infinix ने Infinix GT 10 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचा लूक साधारण नथिंग (Nothing) मोबाईलसारखाच आहे. कंपनीने बॅक पॅनलवर नथिंग (Nothing) प्रमाणेच डिझाईन केले आहे. तुम्हाला जर हा स्मार्टफोन विकर घ्यायचा असेल तर उद्या (4 ऑगस्ट) दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही स्मार्टफोनची प्री-बुकिंग करू शकता.
Infinix GT 10 Pro X6739 launched in India.
— Abhishek Yadav (@yabhishekhd) August 3, 2023
Price: 💶 ₹19,999
Complete specifications
📱 6.67" FHD+ LTPS AMOLED display
120Hz refresh rate, 900nits peak brightness, 1920Hz PWM dimming
🔳 MediaTek Dimensity 8050 - 6nm TSMC process, Mali G77 MC9 GPU
LPDDR4x RAM, UFS 3.1 storage… pic.twitter.com/PdfL0bOCYO
Infinix GT 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Infinix GT 10 Pro मध्ये 120hz च्या रीफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा FHD + LTPS AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चे दोन कॅमेरे आहेत. समोर 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. Infinix GT 10 Pro मध्ये, 5000 mAh बॅटरी 45 वॅट फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे. तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या रंगात मोबाईल फोन खरेदी करू शकाल. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज आहे.
Infinix GT 10 Pro किंमत किती?
या मोबाईलमध्ये (Mobile) 5000 mAh बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा (Selfie Camera) आणि 108MP प्रायमरी कॅमेरा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही Infinix GT 10 Pro केवळ 19,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीने या स्मार्टफोनवर काही सूटही दिल्या आहेत. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या कार्डने पैसे भरून मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला त्वायर 2,000 रुपयांची सूट मिळेल.
'हा' फोन 5 ऑगस्टला लाँच होणार आहे
चीनी स्मार्टफोन निर्माता Poco 5 ऑगस्ट रोजी Poco M6 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. या मोबाईलमध्ये 6.79 इंच FHD + LCD डिस्प्ले, Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी आणि 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. तुम्ही फ्लिपकार्टद्वारे हा मोबाईल फोन खरेदी करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Elon Musk on Twitter : ट्विटरच्या 'X' नंतर पुन्हा मोठा बदल; आता 'Retweet' ऐवजी 'Repost' येणार