Holi 2024 WhasApp Stickers : सोशल मीडियाच्या (Social Media) काळात लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण व्हॉट्सअपचा (Whatsapp) वापर करतात. व्हॉट्सअपचा वापर दूरच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यापासून ते आपल्या व्यावसायिक कामासाठी केला जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणताही सण समारंभ असो आजकाल ऑनलाईन पद्धतीनेच जास्त शुभेच्छा दिल्या जातात. होळीच्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला देखील व्हॉट्सअपवर मित्र मैत्रीणींना, नातेवाईकांना शुभेच्छा पाठवायच्या असतील तर त्यासाठी आता तुम्हाला टाईप करायची गरज नाही. कारण व्हॉट्सअपवर होळीनिमित्ताने (Holi 2024) अनेक भन्नाट स्टिकर्स आणि GIF आहेत. ते तुमच्या मित्र परिवाराला पाठवून तुम्ही सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला अॅपही डाऊनलोड करण्याची गरज नाही.
ॲप डाऊनलोड न करता होळी WhatsApp स्टिकर्स पाठवा
आतापर्यंत तुम्ही व्हॉट्सअपवर शुभेच्छा देण्यासाठी स्टिकर्स डाऊनलोड करत होतात. तसेच, होळीचे स्टिकर ॲप प्ले स्टोअरवरून स्वतंत्रपणे डाऊनलोड करावे लागतील. तसेच, व्हॉट्सॲपवर जीबोर्डसह होळीचे स्टिकर्स आणि जीआयएफ पाठवले जाऊ शकतात.
व्हॉट्सॲप स्टिकर्स आणि GIF कसे पाठवाल?
1. सर्वात आधी तुम्हाला WhatsApp ओपन करावं लागेल.
2. आता तुम्हाला ज्याला होळीच्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत त्या संपर्काच्या चॅटवर जा.
3. आता टायपिंगसाठी पुढे जात असताना, WhatsApp ऐवजी, तुम्हाला Gboard च्या स्माईल आयकॉनवर क्लिक करावं लागेल.
4. या ठिकाणी सर्च आयकॉनवर Holi, Holi 2024 शोधायचे आहे.
5. तुम्ही हे कीवर्ड टाईप आणि सर्च करताच, स्क्रीनवर रंगीबेरंगी होळी स्टिकर्स दिसू लागतील.
6. या स्टिकर्स व्यतिरिक्त, तुम्हाला GIF साठी Holi, Holi 2024 कीवर्ड देखील वापरावे लागतील.
7. येथे तुम्हाला होळीचे स्टिकर्स, कार्टून, GIF मिळतील, तुम्ही कोणत्याही एका GIF वर टॅप करून ते पाठवू शकता.
अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअपवर स्टिकर्स आणि GIF चा वापर करून तुमच्या मित्र-मैत्रीण आणि नातेवाईकांना तुम्ही होळीच्या शुभेच्छा अगदी सहज देऊ शकता. तसेच, इतर सण समारंभाच्या वेळीसुद्धा व्हॉट्सअपवर अशा प्रकारचे स्टिकर्स उपलब्ध असतील तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता.
व्हॉट्सअपवर यूजर्ससाठी सतत नवीन अपडेट येत असतात. यापैकीच व्हॉट्सअप स्टिकर्स हे फीचर आहे. नुकतेच व्हॉट्सअपने 3 पिन चॅट बॉक्स आणि व्हॉट्सअप स्टेटस 1 मिनिट व्हिडीओ असे दोन फीचर्स आणले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :