Elon Musk Neuralink Got Sucess : तंत्रज्ञान दिवसागणिक प्रगती करताना दिसत आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या न्यूरालिंक (Neuralink) कंपनीनं मोठं यश मिळवलं आहे. न्यूरालिंक कंपनीचा ब्रेन चिप संदर्भातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. न्यूरालिंक कंपनीच्या ब्रेन चिपच्या मदतीने एका अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला गेम खेळणं शक्यस झालं आहे. हे तंत्रज्ञान आणि मानवासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे.
अर्धांगवायू झालेल्या व्यक्ती खेळला व्हिडीओ गेम
एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीने या यशस्वी प्रयोगाचा व्हिडीओ एक्स मीडियावर पोस्ट करत ही महत्त्वाची बातमी दिली आहे. न्यूरालिंक कंपनीला ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञानात मिळालेल्या यशामुळे मानवी जीवनात एक नवीन आशा निर्माण झाली आहे. न्यूरालिंक कंपनीने 21 मार्च रोजी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक अर्धांगवायू झालेला माणूस संगणकाच्या कर्सरद्वारे आपल्या विचारांसह बुद्धिबळ खेळत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
एलॉन मस्कच्या न्यूरालिंक चिपची कमाल
व्हिडीओमध्ये अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीचं नाव नोलँड अर्बाग असं आहे. अर्बागचं वय 29 वर्षे आहे. नोलँड अर्बॉग मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे, पण अर्धांगवायूमुळे त्याच्या खांद्याचा खालचा भाग पूर्णपणे निर्जीव झाला आहे. मात्र, न्यूरांलिंकच्या मदतीने त्याला संगणकात्या मदतीने चेस खेळणं शक्य झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ : अर्धांगवायू झालेल्या माणसानेही खेळला गेम, हे कसं शक्य झालं पाहा
हा व्यक्ती संगणकाचा कर्सर मेंदूच्या हाताळताना तुम्हाला दिसेल. या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती सांगत आहे की, 'मी कंम्प्युटरचा कर्सर माझ्या मेंदूच्या साहाय्याने हाताळू शकतो. या कर्सरवर माझ्या मेंदूचं कंट्रोल आहे. स्क्रीनवर दिसणारा कर्सर मी आहे, हा सर्व मेंदूच्या शक्तीचा खेळ आहे.'
मानवी मेंदूद्वारे गॅजेट कंट्रोल
एलॉन मस्क यांनी 2016 मध्ये न्यूरालिंक या कंपनीची स्थापना केली होती. न्यूरालिंक कंपनी विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी सुरु करण्यात आली. न्यूरालिंक कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्यासंदर्भात संशोधन करत आहे. जानेवारी 2024 मध्ये न्यूरालिंकने मानवी शरीरात चिप यशस्वीरित्या बसवल्याची बातमी दिली होती. आता न्यूरालिंकने एक पाऊल पुढे जात ही चिप मेंदू्च्या शक्तीद्वारे गॅजेट कंट्रोल करु शकते, हा प्रयोग यशस्वी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :