Holi 2024 : आज होलिका दहनाचा (Holika Dahan) दिवस. तर, उद्या म्हणजेच 25 मार्च रोजी धुळवडीचा दिवस. होळीचा (Holi 2024) दिवस जसजसा जवळ येतोय तसा तरूणाईत जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय. काहींना रंग खेळायला आवडत नाहीत पण, काहींना रंगांची उधळण करायला खूप आवडतं. पण, अशा वेळी आपल्या त्वचेची काळजी घेणं देखील जास्त गरजेचं आहे. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या रंगांमध्ये हानिकारक केमिकल्स असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात, जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात.  विशेषत: तुमची त्वचा जर संवेदनशील (Sensitive Skin) असेल तर होळीच्या वेळी तुम्ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, या दरम्यान थोडासा जरी निष्काळजीपणा तुमचा चेहरा खराब करू शकतो.  


यंदाच्या वर्षी होळी खेळताना केमिकलमुक्त सुरक्षित होळी खेळण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच बाजारातील रंग वापरण्याऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा, केस आणि डोळ्यांना नुकसान होण्याची भीती राहणार नाही. तसेच तुमचं आरोग्यही चांगलं राहील.  संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी रासायनिक रंग टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात.  


एक दिवस आधी त्वचा हायड्रेट करा


तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, होळीच्या आदल्या रात्री तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवा. यानंतर, सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर SPF 30 किंवा SPF 50 सनस्क्रीन लावायला विसरू नका. याच्या मदतीने तुमची त्वचा अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आणि केमिकलयुक्त रंगांपासून सुरक्षित राहील.


तेल लावा


सनस्क्रीन लावल्यानंतर, तुमच्या चेहऱ्यावर पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावा किंवा त्यावर ऑलिव्ह आणि खोबरेल तेल लावा. रंग खेळण्यापूर्वी केसांना नीट तेल लावा.


रंग कसा स्वच्छ करायचा?


जर तुमच्या चेहऱ्यावर रंग लागला असेल तर तो जास्त घासू नका. त्याऐवजी सर्वात आधी चेहरा फोम फेसवॉशने स्वच्छ धुवा. नंतर चांगल्या क्लिंझरने चेहरा स्वच्छ करा. यानंतर बेसन, हळद, तांदळाचे पीठ, गुलाबपाणी आणि थोडं खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या आणि हलका मसाज करून चेहरा स्वच्छ करा. मात्र, आधी या पेस्टची पॅच टेस्ट करा.


रंग खेळल्यानतर 'अशी' घ्या त्वचेची काळजी  


रंग काढून टाकल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा आणि जर तुम्हाला रॅशेसची समस्या येत असेल तर तुम्ही ताजे कोरफडीचे जेल लावू शकता. होळीनंतर, दोन ते तीन दिवस चेहऱ्यावर कोणतेही रासायनिक मेक-अप प्रोडक्ट्स वापरणे टाळा आणि फेशियल किंवा ब्लीचचा वापर करू नका.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Holi 2024 : होळीच्या दिवशी 'लूकींग लाईक ए वॉव' दिसायचंय? 'या' रंगांची साडी घाला, जणू अभिनेत्री शोभाल, फोटो येतील सुंदर!