Google Search : गुगलवर चुकूनही सर्च करु नका या गोष्टी, अन्यथा महागात पडले
Google Search : कोणत्याही गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करत असाल, पण काही गोष्टी सर्च केल्यास तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे गुगलवर सर्च करताना काळजी घ्या..
Google Search : गुगल आपल्याला कुठल्याही गोष्टीची माहिती देऊ शकते. काहीही सर्च (Google Search ) करा. तुम्हाला काही ना काही माहिती मिळते. गुगल जगात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलवर प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते. पण गुगल जितके फायद्याचे आहे, तितक्याचे तोट्याचे आहे. गुगलवर काही गोष्टी सर्च करणे गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवाही खावी लागू शकते.
भारतात गुगलवर काही गोष्टी सर्च करण्यास बंधने आहेत. गुगलवर तुम्ही त्या गोष्टी सर्च केल्या तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. भारतात गुगगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.. याबाबत पाहूयात..
1. बॉम्ब तयार करण्याची पद्धत
भारतामध्ये बॉम्ब तयार करणे, हा गंभीर गुन्हा मानला जातो. जर तुम्ही गुगलवर बॉम्ब तयार करण्याची पद्धत सर्च करत असाल, तर तुम्हाला दहशतवादाच्या आरोपात अटक केली जाऊ शकते.
2. चाइल्ड पोर्नोग्राफी
भारतामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. जर तुम्ही गुगलवर अशा गोष्टी सर्च करत असाल तर तुम्हाला बाल यौन शोषणाच्या आरोपात अटक केली जाऊ शकते.
3. अवैध औषध
भारतामध्ये अवैध औषधांची विक्री आणि खरेदी करणे गंभीर गुन्हा मानला जातो. जर तुम्ही गुगलवर अवैध औषधं सर्च करत असाल तर ड्रग्सच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक होऊ शकते. त्यानंतर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल.
4. हॅकिंग
भारतात हॅकिंग हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. जर गुगलवर तुम्ही हॅकिंगसंदर्भात सर्च करत असाल, तर सायबर गुन्ह्याखाली तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे गुगलवर चुकूनही हॅकिंग संदर्भात सर्च करु नका, किंवा काळजी घ्या.
वरील चार गोष्टींशिवाय गुगलवर काही इतर गोष्टी सर्च करणेही गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. उदाहरण म्हणून पाहायचे झाले तर गुगगलवर आत्महत्या अथवा हत्या करण्याच्या पद्धती सर्च करत असाल तर तुम्हाला मेंटल हेल्थ प्रॉब्लम्स (मानसिक आरोग्य)साठी मदतीची गरज भासू शकते.
गुगलवर सुरक्षित सर्चिंग करण्यासाठी या टिप्स फॉलो करा...
संशयास्पद किंवा हानिकारक कंटेंट असलेल्या वेबसाइटवर भेट देणे टाळा. जर तुम्ही एखादी गोष्ट शोधत असाल ज्याबद्दल तुम्हाला खात्री नसेल की ती कायदेशीर आहे की नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तज्ञ किंवा वकिलाचा सल्ला घेऊ शकता.म्हणजे काय तर Google कडे जबरदस्त ट्रॅकिंग सिस्टम आहे. तुम्ही काय सर्च करता याची नोंद होते. अशा परिस्थितीत, गुगलचा वापर काळजीपूर्वक करा. अडचणीत आणू शकेल अशा कोणत्याही गोष्टी सर्च करु नका.