एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Twitter Logo: एलॉन मस्क यांनी बदलला ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड Logo; त्याऐवजी ठेवलाय Doge Meme, युजर्स हैराण

Twitter Logo: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी आता ट्विटरचा लोगो बदलला असून आता युजर्सला ट्विटरच्या पेजवर ब्लू बर्डऐवजी डोगेचा फोटो दिसत आहे.

Twitter Logo: ट्विटरचे (Twitter) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) हे त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांसाठी ओळखले जातात. ट्विटरची मालकी घेतल्यापासूनच मस्क त्यांच्या झटपट आणि भन्नाट निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतात. अशातच आता नव्या निर्णयामुळे एलॉन मस्क चर्चेत आहेत. आज पहाटे जर तुम्ही ट्विटर ओपन केलं असेल तर तुम्हाला ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला असेल. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवलाय. पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.

Twitter होम बटणावर झालाय बदल  

मात्र, हा बदल सध्या ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि युजर्सना सध्या ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणार्‍या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डोगेचं चित्र दिसत आहे आणि हा बदल काही तासांपूर्वीच झाला आहे.

एलॉन मस्क यांचे मजेशीर ट्वीट 

ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्टही शेअर केली. त्यांनी आपल्या अकाउंटवर डॉगे मीम शेअर करत एक मजेशीर ट्वीटही शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, "ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे."

Doge Image नक्की आहे तरी काय? 

आयकॉनिक ब्लू-बर्डला हटवून एलॉन मस्क यांनी ठेवलेली Doge Image नेमकी काय आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. डॉज (Doge) इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक आणि लोगो आहे.  2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक विनोद म्हणून Doge Image लॉन्च करण्यात आलं होतं. 

Twitter Logo: एलॉन मस्क यांनी बदलला ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड Logo; त्याऐवजी ठेवलाय Doge Meme, युजर्स हैराण

एलॉन मस्कनं शेअर केला जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉट 

एलॉन मस्कनं त्यांच्या अकाऊंटवर एका जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका अज्ञात अकाउंटशी चर्चा करत आहेत. यामध्ये ती व्यक्ती मस्क यांना ट्विटरच्या बर्ड लोगोच्या जागी Doge Image लावण्यास सांगत आहे. काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये ही पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे की, 'As promised' म्हणजेच, जे वचन दिलं ते मी पूर्ण केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Embed widget