Airan Quazi SpaceX  : काही मुलांना सर्वसामन्य मुलांपेक्षा जास्त बुद्ध्यांक लाभलेला असतो. यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयातच नोकऱ्यांची ऑफर मिळते.  बऱ्याच मुलांना बघितल्यावर समजतं की, ते मोठे झाल्यावर काही तर वेगळं करणार  आहेत. यालाच बाळाचे पाय पाळण्यात दिसून येतात असं म्हटलं जातं. कैरान काजी (Kairan Quazi) याच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलाचं टॅलेंट बालपणीच माहिती पडलं होतं. कैरानने बुद्ध्यांक चाचणीत 99.9 पर्सेंटाईल गुणांक मिळवले आहेत. त्याच्या याच गुणवत्तेमुळे अनेकजण भारावल्याचं चित्र आहे. त्याच्या कुटुंबाने ब्रेनगेन मासिकाला सांगितले की, काजीने काही महिन्यांनंतर इंटेल लॅबमध्ये एआय रिसर्च को-ऑप फेलो म्हणून इंटर्नशिप केली. वयाच्या 11 व्या वर्षी तो संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी सांता क्लारा विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता नुकतंच एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्याला  स्पेसएक्स (SpaceX) या अंतराळ संस्थेत जॉब ऑफर केली आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया... 


कैरान काजी असामान्य प्रतिभा लाभलेला मुलगा आहे. ज्याची हुशारी ओळखून एलॉन लान मस्क यांनी त्याला जॉब ऑफर केली आहे. ही जॉब ऑफर कैरान काजी याने स्वीकारली आहे. तो लवकरच कामावर रूजू होणार आहे. आश्चर्य म्हणजे कैरान अवघ्या 14 वर्षाचा आहे. या वयात अनेक मुलांना मित्रांसोबत खेळायला, बागडायला आवडतं. मात्र त्याने लहानपणापासूनच काही तरी मोठे करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. यामुळे मस्क यांच्या कंपनीने  त्याला 'अनपेक्षित ऑफर'  दिली आहे. या ऑफरमुळे कैरान प्रचंड आनंदी आहे. 


कमी वयात मिळविले मोठे यश  


कैरान याने आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये नोकरीच्या ऑफरची माहिती दिली आहे. कैरान यांनी सांगितले की, ' मी स्टारलिंकच्या इंजिनिअरिंग टीममध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून जॉईन करणार  आहे, जी जगातील सर्वोत्तम कंपनी असल्याचं मानलं जातं.' कैरान लवकरच सांता क्लारा युनिव्हर्सिटीच्या इंजिनिरिंग स्कूलमधून पदवीधर होणार आहे. यासाठी त्याला संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त होईल. यानंतर तो स्पेसएक्समध्ये(SpaceX)एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार आहे. इतक्या कमी वयात अशी ऑफर मिळविणारा कैरान जगातील पहिला मुलगा ठरला आहे. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गेल्या वर्षी त्याने सायबर इंटेलिजन्स फर्म Blackbird.AI मध्ये मशीन लर्निंग इंटर्न म्हणून चार महिने काम केलं आहे. आता इलॉन मस्क यांनी त्याला  SpaceX या अंतराळ संस्थेत जॉब ऑफर केली आहे. 


लहानपणापासूनच आहे प्रतिभासंपन्न 
 
जेव्हा  कैरान 2 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आई-वडिलांना हे माहिती झाल होतं की, आपलं मुल काही सर्वसामान्य मुल नाही. ते अत्यंत प्रतिभासंपन्न आणि हुशार आहे. बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. याची त्यांना प्रचिती आली होती. याचं कारण त्याला लहान वयातचं पूर्ण वाक्य स्पष्टपणे बोलता येत होतं. आपल्या शाळेतील शिक्षकांना रेडिओवर ऐकलेल्या बातम्या तो खडखड बोलून दाखवत होता. 'स्टारलिंक' (Starlink) स्पेसएक्स कंपनीची एक सॅटेलाइट इंटरनेट सेवा आहे.  


वाचा इतर बातम्या :


Elon Musk: ट्विटर आता व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्याच्या तयारीत; ट्विटरवरुन करता येणार ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल