Free antivirus & malware removal Tools : आजकाल सायबर क्राईमची संख्या वरचेवर वाढत आहे. स्कॅमर आणि हॅकर यांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. फोन किंवा डेस्कटाॅप हॅक करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात आणि परिणामी Phone , Computer हॅक होतो. काही वेळेस एका अनोळखी नंबर वरून तुम्हाला काॅल किंवा मेसेज येत नाही. तरीही तुमच्या बँक अकाउंट आणि फोनमधील संपूर्ण डाटा साफ होतो. मात्र हा सगळा डाटा जाण्याचे कारण आहे Phone किंवा  Computer मधील व्हायरस. हा व्हायरस सिस्टिमच्या बॅकग्राउंडमध्ये इंस्टाॅल होतो आणि तुमचा सर्व डेटा रिमोट सर्वरकडे पाठवला जातो. व्हायरस कोणत्याही कारणाने सिस्टीममध्ये येऊ शकतो. 


तुम्ही थर्ड पार्टी वेबसाइट, पायरेटेड सॉफ्टवेअर, अॅडल्ट साइट इत्यादीसारख्या कोणत्याही संशयास्पद वेबसाइटला भेट दिली तर ती तुमच्या मोबाइल किंवा डेस्कटॉपमध्ये इन्स्टॉल केली जाऊ शकते आणि तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसते. अलीकडे लोकांना व्हॉट्सअॅपवरही फसवणुकीशी संबंधित मेसेज येत आहेत. अनेक लिंक्स देखील तुम्हाला पाठवल्या जातात. सतत वाढत जाणारे सायबर गुन्हे कमी करण्यासाठी, भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक सुरक्षा एजन्सी तयार केली आहे, जी अशा घोटाळ्यांबद्दल लोकांना जागरूक करण्याचे काम करते असते. यासोबतच वेगवेगळ्या वेबसाइट्सचे निरीक्षण करूते आणि नवीन धोक्यांची माहिती देते. सायबर स्वच्छता केंद्र असे या संस्थेचे नाव आहे. आपण त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता. ज्यावर अनेक अॅप्सबद्दल तुम्हाला माहीती देण्यात आली आहे. 


असे करा अॅप डाउनलोड (How To Download App)


सायबर स्वच्छता केंद्र ही वेबसाईट तुम्हाला व्हायरस पासून सिस्टीमची सुरक्षा करण्यासाठी काही टूल्स बद्द्ल माहिती देते. यामध्ये  ईस्कॅन अँटीवायरस, K7 सुरक्षा आणि Quick Heal यांचा समावेश आहे. मोबाइल मधून जर तुम्हाला व्हायरस घालवायचा असल्यास M-Kavach 2 आणि ईस्कॅन अँटीवायरस हे अॅप डाउनलोड करा. M-Kavach 2 ला C-Dac ने हैदराबादमध्ये IT च्या मदतीने हे तयार केले आहे. 


काय आहे सायबर स्वच्छता केंद्र 


सायबर स्वच्छता केंद्र हे सीईआरटी चा एक भाग आहे. सिस्टीममध्ये असणारा व्हायरस काढण्यासाठी आणि लोकांना याबद्दल कल्पना देण्यासाठी ही वेबसाईट बनवण्यात आली आहे. एजन्सी लोकांना अॅप्स आणि मेसेजद्वारे मालवेअरची माहिती देते आणि ते कसे काढायचे याबद्दल माहिती देते.


 


इतर महत्वाच्या बातम्या


ट्विटरप्रमाणे Facebook आणि Instagramची ब्लू टिकही सशुल्क; भारतात मेटाकडून पेड व्हेरिफिकेशन सुविधा सुरू