SpaceX : एलॉन मस्क आणि अमेरिकन सैन्याचं गुप्त मिशन, SATCOM 2 सॅटेलाईट लाँच
स्पेसएक्सने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) कॅनडी स्पेस सेंटरवरून एक हेव्ही फॉल्कन रॉकेट लाँच केलं आहे. स्पेसएक्स कंपनीकडून कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 USSF-67 (CBAS-2 Mission) सॅटेलाइट लाँच करण्यात आलं आहे. ( PC : SpaceX/twitter )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे सॅटेलाईट अमेरिकन स्पेसफोर्ससाठीचं क्लासिफाईड (USSF-67) गुप्त मिशन आहे. निवडक जण वगळता स्पेसएक्स आणि अमेरिकन सरकारला या गुप्त मोहिमेबाबत अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. ( PC : SpaceX/twitter )
स्पेसएक्सकडून SATCOM 2 (CBAS-2) हे सॅटेलाईट पृथ्वीपासून 35 हजार किलोमीटर अंतरावर पाठवण्यात आलं आहे. ( PC : SpaceX/twitter )
मीडिया रिपोर्टनुसार, कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 (CBAS-2) हे सॅटेलाईट पृथ्वीबाहेरील कक्षेत यशस्वीरित्या पाठवण्यात आलं आहे. हे सॅटेलाईट अमेरिकेच्या गुप्त यंत्रणेसाठी फार महत्त्वाचं आहे. ( PC : SpaceX/twitter )
SATCOM 2 हा सैन्य दलांना अधिक माहिती देऊन त्यांचा संपर्क वाढवण्यात आणि शत्रूशी दोन हात करण्यासाठी आवश्यक माहिती सेन्य दलाला पोहोचवेल. ( PC : SpaceX/twitter )
स्पेस फोर्सच्या अधिकार्यांनी Space.com ला दिलेल्या माहितीनुसार, CBAS-2 या मिशनचा उद्देश विद्यमान लष्करी उपग्रहांची संपर्क क्षमता वाढवणे आणि सॅटेलाईटद्वारे सतत नवीन सैन्य डेटा उपल्बध करणे हे आहे. ( PC : SpaceX/twitter )
फाल्कन हेवी रॉकेट हे SpaceX चे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. आतापर्यंत या रॉकेटने 5 प्रक्षेपण आणि 11 लँडिंग केले आहे. ( PC : SpaceX/twitter )
स्पेसएक्स कंपनी आणि अमेरिकन लष्कराकडून कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 USSF-67 (CBAS-2) सॅटेलाइट लाँच करण्यात आलं आहे. ( PC : SpaceX/twitter )
फाल्कन हेवी रॉकेट सुमारे 64 मेट्रिक टन कक्षेत पोहोचू शकतो. USSF-67 या सॅटेलाईटचे वजन 18,747 विमानांच्या वजनाएवढे आहे. ( PC : SpaceX/twitter )
नुकताच SpaceX ने एक व्हिडीओ शेअर करत नुकत्याच लाँच झालेल्या मिशनची माहिती दिली आहे. फाल्कन 9 रॉकेटच्या पहिल्या स्टेजवर कॅमेरा बसवण्यात आला आहे. या लाँचचा संपूर्ण व्हिडीओ स्पेसएक्सने शेअर केला आहे. ( PC : SpaceX/twitter )
याशिवाय SpaceX ने नुकतेच 54 नेक्स्ट जनरेशन स्टारलिंक इंटरनेट सॅटेलाइट्स देखील लाँच केले आहेत. ( PC : SpaceX/twitter )