एक्स्प्लोर

AI Impact on Software Engineers: "AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

AI Impact on Software Engineers: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचं काम अधिक सोपं व्हावं, त्यांची उत्पादकता वाढावी आणि वेळखाऊ कामांपासून त्यांची सुटका व्हावी, अशी अपेक्षा होती.

AI Impact on Software Engineers: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI मुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचं (Software Engineers) काम अधिक सोपं व्हावं, त्यांची उत्पादकता वाढावी आणि वेळखाऊ कामांपासून त्यांची सुटका व्हावी, अशी अपेक्षा होती. मात्र, आता AI च्या वाढत्या वापरामुळे एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. AI मुळे इंजिनिअर्सचा वेळ वाचण्याऐवजी ते नेमकं काय तयार करत आहेत, कोड कसा काम करतो आणि एखादी समस्या नेमकी कशी सोडवायची, याची समजच कमी होण्याची भीती काही इंजिनिअर्सकडून व्यक्त केली जात आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पोस्टमुळे सुरू झालेल्या या चर्चेत झोहोचे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू (Sridhar Vembu) आणि टेक अब्जाधीश एलन मस्क (Elon Musk) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

AI Impact on Software Engineers: ‘AI तूने क्या किया, इंजिनिअरिंगचा हाल इतका भयानक...’

या चर्चेला सुरुवात झाली ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या पोस्टमुळे. ‘voxium’ या नावाने पोस्ट करणाऱ्या इंजिनिअरने एका मोठ्या कंपनीतील आपला अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितलं की, कंपनीत नवीन भूमिका स्वीकारून जवळपास दोन आठवडे झाले असून, इंजिनिअरिंगच्या कामात Anthropic या कंपनीच्या ‘Claude Code’ या AI टूलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं त्यांनी पाहिलं.

या इंजिनिअरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “इंजिनिअरिंगचा हाल सध्या भयानक आहे. एका मोठ्या कंपनीत मला नवीन रोल सुरू करून अर्धा महिना झाला आहे. इथे कोणालाच काही माहिती नाही. स्पेक्स, कोड, टेस्ट्स, PRD, टिकट्स, त्यांचं समाधान, रिपोर्ट्स... सगळं काही ‘क्लॉड कोड’ बनवत आहे. माझ्या टीममध्ये कोणालाही ही परिस्थिती आवडत नाही.”

AI Impact on Software Engineers: कोड, टेस्टिंग, रिपोर्ट्स... सगळं AI करतंय?

या इंजिनिअरने उपस्थित केलेला मुख्य मुद्दा म्हणजे AI-जनरेटेड कोड (AI-Generated Code) तयार करण्यापेक्षा तो समजून घेण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. मात्र, AI कडून मोठ्या प्रमाणावर काम करून घेतलं जात असल्याने इंजिनिअर्सकडे तयार झालेला कोड सखोलपणे समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ उरत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

त्यांच्या मते, इंजिनिअर्स पूर्वीप्रमाणे समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचं निराकरण करण्याऐवजी AI ला सूचना देत आहेत, त्यातून मिळालेला आउटपुट तपासत आहेत आणि पुढील प्रक्रियेसाठी त्याचा वापर करत आहेत. यामुळे बग्स शोधणे, सिस्टमची रचना समजून घेणे आणि कोडमागचं लॉजिक जाणून घेण्याची प्रक्रिया कमी होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Sridhar Vembu: श्रीधर वेम्बूंची चिंता; ‘AI वापरा, पण समज त्याच्या हवाली करू नका’

या पोस्टवर झोहोचे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी AI च्या वापराला विरोध केलेला नाही. उलट, आपल्या इंजिनिअर्सना AI चा वापर करण्याचा सल्ला देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, स्वतःची समज आणि विवेक AI कडे सोपवू नये, असा त्यांनी इशारा दिला. श्रीधर वेम्बू यांनी लिहिलं, “हे खरंच दुःखद आहे. मी माझ्या इंजिनिअर्सना नेहमी AI चा वापर करण्यास सांगतो, पण कधीही तुमची समज आणि विवेक AI च्या हवाली करू नका,” असे त्यांनी म्हटले आहे.

टेक इंडस्ट्रीच्या (Tech Industry) सध्याच्या स्थितीची तुलना त्यांनी एका नव्या आणि अत्याधुनिक कारशी केली. एक इंडस्ट्री म्हणून आपण अशी नवीन आणि फॅन्सी कार अतिशय वेगाने चालवत आहोत, जी चालवण्याची पद्धत आपल्याला अद्याप नीट समजलेली नाही, असा त्यांचा आशय होता. AI चा वेगाने स्वीकार करताना त्यामागची तांत्रिक समज आणि मानवी निर्णयक्षमता कायम ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होतं.

Elon Musk: एलन मस्क यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या संपूर्ण चर्चेने टेक अब्जाधीश एलन मस्क यांचंही लक्ष वेधून घेतलं. त्यांनी संबंधित इंजिनिअरच्या पोस्टवर केवळ ‘Yikes’ अशी प्रतिक्रिया दिली. ‘Yikes’ हा शब्द साधारणपणे धक्का, चिंता किंवा एखादी परिस्थिती अस्वस्थ करणारी वाटल्याचं व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. मस्क यांच्या या छोट्याशा प्रतिक्रियेमुळे AI-आधारित सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटबाबत सुरू असलेल्या चर्चेला आणखी प्रसिद्धी मिळाली.

आणखी वाचा

Best Headphones: दर्जेदार ऑडिओ, दीर्घकाळ चालणारी बॅटरी, अन् 80 तासांपर्यंतच्या प्लेबॅकचा अनुभव; हेडफोन्स घेण्याचा विचार करताय, मग boAtचे हे पर्याय अवश्य पाहाच!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget