Yonex Taipei Open 2022 : तैपई ओपन स्पर्धेतील (Yonex Taipei Open 2022) पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पारुपल्ली कश्यपला मलेशियाच्या सूंग जू वेनने मात दिली आहे. पारुपल्ली भारताचा या स्पर्धेतील अखेरचा बॅडमिंटनपटू असल्याने भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. याआधी उपांत्यपूर्व फेरीतच भारताची मिश्र दुहेरी जोडी तनिषा क्रास्टो आणि इशान भटनागर (Ishaan Bhatnagar and Tanisha Crasto) यांचा मलेशियाच्या हू पांग रॉन (Hoo Pang Ron) आणि तो ई वेई (Toh Ee Wei) दुहेरी मिश्र जोडीनं 19-21, 12-21 च्या फरकाने पराभव केला.
दरम्यान पारुपल्ली आणि सूंग यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. दोन्ही खेळाडूंना चांगली झुंज दिली. तब्बल 55 मिनिटं सामना सुरु होता. सामन्यातील पहिली फेरी मलेशियाच्या सूंगने 21-12 च्या फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. पण दुसऱ्याच सेटमध्ये पारुपल्लीने पुनरागमन करत 12-21 च्या फरकाने विजय मिळवत बरोबरी केली. पण अखेरचा सेट सूंगने 21-17 च्या फरकाने जिंकत सेट आणि सामना नावे केला. यामुळे पारुपल्लीचं आव्हान इथेच संपलं तर सूंगने उपांत्य फेरी गाठली आहे.
ईशान-तनिषा जोडीही पराभूत
ईशान भटनागर आणि तनिषा क्रॅस्टो यांनी मिश्र दुहेरीच्या सामन्यात वेगवान सुरुवात केली. परंतु,मलेशियन जोडीनं मध्यंतरात 11-7 अशी आघाडी घेत चार गुणांचा फायदा घेतला आणि पहिला सेट 21-19 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासून मलेशिया जोडीनं आक्रमक खेळी करत भारतावर दबाव निर्माण प्रयत्न केला, ज्याचा फायदा त्यांना मिळाला. दुसऱ्या सेटमध्ये मलेशियानं भारताला 21-12 असं पराभूत केलं. या पराभवानंतर भारताची मिश्र दुहेरी जोडी ईशान भटनागर- तनिषा क्रॅस्टो स्पर्धेतून बाहेर झालीय. तनीषा- इशान भटनागर दुहेरी मिश्र जोडीनं तैपेईच्या चेंग काय वेन आणि वांग यु क्विओ जोडीविरुद्ध 21-14, 21-17 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
हे देखील वाचा-
- Yonex Taipei Open 2022: भारताची मिश्र दुहेरी जोडी तनीषा क्रास्टो-इशान भटनागर यांचं आव्हान संपुष्टात!
- IND vs WI, 1st ODI Playing 11 : जाडेजाला दुखापत, अक्षर पटेलला मिळाली संधी, पहिल्या सामन्यासाठी कसा आहे भारतीय संघ?
- Commonwealth Games 2022: कामनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार- स्मृती मानधना