IND vs WI : इंग्लंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत नमवल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीवेळीच भारतासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. संघातील महत्त्वाचा खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे दोन एकदिवसीय सामन्यांना मुकणार असल्याची माहिती समोर आली. दरम्यान जाडेजाच्या जागी पहिल्या सामन्यात अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.
सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक पार पडली असून वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंनी भरला असून श्रेयस, संजू, शुभमन हे युवा फलंदाज बऱ्याच काळानंतर एकत्र मैदानात उतरतील. अष्टपैलू कामगिरीकरता अक्षर पटेल सोबत शार्दूल ठाकूर असून गोलंदाजीची मुख्य जबाबदारी युजवेंद्र चहलवर असेल. फिरकीपटूंसाठी आजची खेळपट्टी उपयुक्त असल्याने पटेल-चहल जोडीकडे सर्वांचे लक्ष असेल. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा वेगवान गोलंदाजी करतील. तर नेमका संघ कसा आहे पाहूया...
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 1st ODI Preview : आज रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना, मैदानाची स्थिती, Head to Head रेकॉर्ड, सर्वकाही एका क्लिकवर
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!