Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (Indian Olympic Association) एकूण 322 सदस्यांची घोषणा केलीय. ज्यात 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. कामनवेल्थ क्रिडा स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाचा समावेश केलाय. या स्पर्धेत भारतीय संघ 29 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताची उप-कर्णधार स्मृती मानधनानं कामनवेल्थ गेम्समध्ये टीम इंडियाचा सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार असेल, असं म्हणत या स्पर्धेतील आपली भूमिका स्पष्ट केलीय.

स्मृती मानधना काय म्हणाली?"कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ उत्साहित आहेत. जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकतो आणि कानावर देशाचं राष्ट्रगीत पडतं, त्यावेळी काय भावाना असते? हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. यामुळं या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या हेतूनचं आम्ही मैदानात उतरू."

ट्वीट-

भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

तारीखसामनेठिकाणवेळ
29 जुले 2022ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतएजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
31 जुले 2022भारत विरुद्ध पाकिस्तानएजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
03 ऑगस्ट 2022भारत विरुद्ध बारबाडोसएजबॅस्टन, बर्मिंगहॅम6:00 pm – 9:30 pm
06 ऑगस्ट 2022उपांत्य फेरी 1एजबॅस्टन, बर्मिंगहॅम11:00 am– 2:30 pm
06 ऑगस्ट 2022उपांत्य फेरी 2एजबॅस्टन, बर्मिंगहॅम6:00 pm – 9:30 pm
07 ऑगस्ट 2022कांस्यपदक सामनाएजबॅस्टन, बर्मिंगहॅम10:00 am– 1:30 pm
07 ऑगस्ट 2022सुवर्णपदक सामनाएजबॅस्टन, बर्मिंगहॅम5:00 pm – 8:30 pm

कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ-हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), यास्तिका भाटिया (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमाह रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा. 

हे देखील वाचा-