नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमाननगर, धंतोली, गांधीबाग, सतरंजीपूरा, लकडगंज, आशिनगर आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 23 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल हनुमाननगर झोन अंतर्गत हुडकेश्वर रोड येथील स्मार्ट पॉईंट या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत उंटखाना येथील Manlawa Restarunt यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत संत्रा मार्केट येथील सुंदर स्विट, केंटा कॉलोनी येथील अजय प्लास्टिक आणि महाल मार्केट येथील गौरव क्लॉथ स्टोअर या दुकानांविरुध्द कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Nagpur : पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा, 1962 या टोल फ्री क्रमांका वर साधा संपर्क
सतरंजीपूरा झोन अंतर्गत मारवाडी चौक, जुना भंडारा रोड येथील प्रिन्स बेकरी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत वनदेवी नगर, कळमना येथील महेन्द्र किराणा स्टोअर्स आणि शास्त्रीनगर येथील शिव सुप्रिम फुड या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत हबीब नगर, टेका नाका येथील न्यू स्टार बेकरी या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत झेंडा चौक, झिंगाबाई टाकळी येथील न्यू राजस्थान कॉटन फेब प्रदर्शनी या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.