एक्स्प्लोर
CONFIRMED : योगेश्वरला 2012 च्या ऑलिम्पिकचं कांस्यऐवजी रौप्यपदक मिळणार

नवी दिल्ली : 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या योगेश्वर दत्तला आता रौप्यपदक मिळणार आहे. रौप्य पदक विजेता रशियन खेळाडू बेसिक खुदोखोज हा डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याचं रौप्यपदक आता भारताच्या योगेश्वर दत्तला मिळणार आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो वजनी गटात रशियाच्या बेसिक खुदोखोजने हे रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर 2013 साली एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांचं पुन्हा परीक्षण केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला. दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमधून योगेश्वरला पहिल्याच फेरीत हार पत्कारून रिकाम्या हाताने भारतात परतावं लागलं होतं. मात्र, लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यऐवजी रौप्य पदक मिळणार असल्याने योगेश्वरला हा सुखद धक्का आहे. आता योगेश्वर दत्त हा ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारा दुसरा भारतीय पैलवान ठरला आहे.
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला






















