एक्स्प्लोर

डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची बंदी; चार दिवसांपूर्वीच म्हणाली होती, 'मी बृजभूषण सिंहच्या शोषणाची बळी'

Vinesh Phogat: वजन जास्त असल्याचे आढळल्याने विनेश फोगाटला ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले होते. तेव्हा तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.

Vinesh Phogat: भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाटवर 26 जूनपर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यावर बंदी घातली आहे. WFI ने विनेशला नोटीस बजावली असून WFI चे नियम, उत्तेजक द्रव्य विरोधी नियम आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. WFI ने म्हटले आहे की, विनेश तिच्या निवृत्तीची सहा महिन्यांची पूर्वसूचना देण्यात अपयशी ठरली आहे. विनेशच्या वागणुकीमुळे देशाला लाजिरवाणे वाटले असून भारतीय कुस्तीची प्रतिमा डागाळली आहे. वजन जास्त असल्याचे आढळल्याने विनेश फोगाटला ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले होते. तेव्हा तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. तथापि, नंतर तिने आपला निर्णय मागे घेतला.

बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप

दुसरे म्हणजे, या महिन्याच्या 4 मे रोजी, आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेने (ITA) 18 डिसेंबर 2025 रोजी बंगळूरु येथे डोपिंग चाचणी देण्यास अपयशी ठरल्याबद्दल विनेश फोगाटला नोटीस बजावली होती. गेल्या आठवड्यात, माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप केले होते. 3 मे रोजी विनेश फोगटने डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विनेश म्हणाली, "उत्तर प्रदेशातील गोंडा येथे 10 ते 12 मे दरम्यान सिनियर ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धा आयोजित केली जात आहे."

आज, काही अडचणींमुळे मला हे सांगायचे आहे की, बृजभूषण शरण यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेल्या सहा पीडितांपैकी मी एक आहे. माझी साक्ष न्यायालयात सुरू आहे. त्यांच्या घरी (गोंडा) जाऊन स्पर्धेत भाग घेणे माझ्यासाठी अवघड होईल. मला नाही वाटत की मी माझे 100 टक्के देऊ शकेन. एका मुलीसाठी हे खूप कठीण असेल. मी आणि माझी टीम स्पर्धेत भाग घेऊ. काही चुकीचे घडल्यास, भारत सरकार जबाबदार असेल.

सुमारे तीन वर्षांपूर्वी विनेशने बृजभूषण यांच्यावर महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. दिल्लीतील जंतर मंतर येथे महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण  यांच्या विरोधात आंदोलनही केले. विनेश या हरियाणातील जुलाना येथील काँग्रेसच्या आमदार आहेत. बृजभूषण हे भाजपचे माजी खासदार आहेत. सध्या, त्यांचा एक मुलगा खासदार आहे आणि दुसरा उत्तर प्रदेशमधून आमदार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
Ryan Ten Doeschate News : भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget