एक्स्प्लोर

Vinesh Phogat: विनेश फोगाट पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरणार, निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; म्हणाली, आता लक्ष्य...

Vinesh Phogat: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर मोठा यू-टर्न घेत आखाड्यात पुनरागमनाची घोषणा केली आहे.

Vinesh Phogat: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर मोठा यू-टर्न घेत अखाड्यात पुनरागमनाची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान केलेल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रथमच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपला पुढील प्रवास स्पष्ट केला. LA 2028 ऑलिम्पिक हेच आता तिचे नवे लक्ष्य असल्याचे विनेशने जाहीर केले असून, ती लवकरच कठोर प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे.

Vinesh Phogat: 50 ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम फेरीतून बाद, अन् निवृत्ती

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी करत फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र, अवघ्या 50 ग्रॅम वजन जास्त असल्याचे कारण देत तिला फायनलमधून बाहेर करण्यात आले. या धक्कादायक निर्णयानंतर भावनिक झालेल्या विनेशने निवृत्ती जाहीर केली होती.

Vinesh Phogat: कुस्ती हा केवळ खेळ नाही, तो माझा श्वास

आता विनेशने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, “अनेक लोक मला विचारत होते की पॅरिस हे माझं शेवटचं ऑलिम्पिक होतं का? तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं. मला स्वतःपासून, स्पर्धेच्या दबावापासून, अपेक्षांपासून आणि अंतर्गत धडपडीतून काही काळ दूर राहण्याची गरज होती. अनेक वर्षांनी मला खऱ्या अर्थाने शांत झोप मिळाली.”

तिने पुढे सांगितले की, “मन तुटलं आहे, अनेक त्याग केले आहेत, जे जगाने पाहिलेही नाहीत. शिस्त, दिनचर्या आणि संघर्ष अंगी भिनलेले आहेत. कितीही दूर गेले तरी माझा एक भाग नेहमी मॅटवरच असतो. कुस्तीबद्दलची आवड कधीच कमी झाली नाही. कुस्ती हा केवळ खेळ नाही, तो माझा श्वास आहे.”

Vinesh Phogat: 2028 ऑलिम्पिकची तयारी; नव्या जोमात पुनरागमन

विनेशने स्पष्ट केलं की, आता ती LA28 ऑलिम्पिककडे निर्धाराने वाटचाल करणार आहे. विशेष म्हणजे, तिच्या पुनरागमनात तिचा लहान मुलगाही सहभागी होणार असून, “तो माझा छोटासा चीयरलीडर असेल”, असं विनेशने भावूक होत म्हटलं आहे.

Vinesh Phogat: CAS मध्ये अपील फेटाळलं, तरीही जिद्दीला ब्रेक नाही

पॅरिस ऑलिम्पिकमधील अन्यायकारक निर्णयाविरोधात विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील केलं होतं. समितीही स्थापन झाली होती, मात्र सुनावणीला उशीर झाल्याने तिची अपील फेटाळण्यात आली. विनेशने आतापर्यंत तीन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केले असले तरी तिच्या गळ्यात ऑलिम्पिक पदकाची माळ अद्याप पडलेली नाही. आता 2028 हेच तिचं सर्वोच्च ध्येय आहे.

Vinesh Phogat: राजकारणातही चमक; जुलाना मतदारसंघातून विजयी

कुस्तीबरोबरच विनेश फोगाटने राजकारणात पदार्पण केले असून, हरियाणातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर 6,015 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. तर निवृत्तीचा निर्णय मागे घेत, नव्या आत्मविश्वासाने विनेश अखाड्यात परतण्यासाठी सज्ज झाली आहे. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणे हेच तिचे अंतिम लक्ष्य असल्याचे तिने सांगितले आहे.

आणखी वाचा

Vaibhav Suryavanshi News : 14 षटकार, 9 चौकार, वैभव सूर्यवंशी पुन्हा तळपला, 171 धावांची वादळी खेळी!

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget