T20 World Cup 2022: झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका (Zimbabwe vs South Africa) यांच्यात होबार्ट (Hobart) येथे सुपर-12 फेरीतील सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. पावसामुळं हा सामना 9-9 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. झिब्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 80 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं जोरदार प्रहार केला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं  (Quinton de Kock) आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूत नाबाद 47 धावांची खेळी केली. परंतु, पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, टी-20 विश्वचषकातील पहिल्या षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम क्विंटन डि कॉकच्या नावावर नोंदवला गेला आहे. 


झिम्बाब्वेकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकनं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पहिल्या चेंडूवर त्यांनं चौकार ठोकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मारला. क्विंटन डी कॉकनं चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. तर, पाचव्या चेंडूवर चौकार मारला. या षटकारातील अखेरच्या चेंडूवर त्याला फक्त एक धावा घेता आली. अशाप्रकारे त्यानं एकूण 23 धावा केल्या. जे टी-20 विश्वचषक सामन्यात संघातील खेळाडूनं केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. महत्वाचं म्हणजे, या सामन्यात क्विंटन डी कॉकनं अवघ्या 12 चेंडूत 39 धावा कुटल्या.  या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि एक षटकार निघाला. क्विंटन डी कॉकच्या या खेळीचं कौतूक केलं जात आहे.


ट्वीट-






 


दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा विक्रम मोडला
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात 2016 मध्ये पहिल्याच षटकात इंग्लंड संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 धावा केल्या होत्या. तर, 2009 च्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं ओव्हलवर स्कॉटलंडविरुद्ध 19 धावा केल्या होत्या. हे सर्व विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 23 धावा करून मोडीत काढले आहेत.


हे देखील वाचा-